शेतकरी वजनकाटा 33 लाखांचा : ऊस उत्पादकांना फायदा झाला 77 कोटींचा

शिरोळ (प्रतिनिधी) : आंदोलन अंकुशच्या पुढाकाराने शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर शेतकरी वजनकाटा उभारण्यात आला आहे. गत ऊस हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या उसाची वाहने मोठया प्रमाणात या वजनकाट्यावर वजन करून मगच तो ऊस कारखाण्याला पाठवल्याने भागातील कारखान्यांना आपले वजनकाटे यावर्षी चोख ठेवावे लागले. त्यामुळे याचा परिणाम म्हणून या भागातील उसाचे एकरी उत्पादन वाढून शेतकऱ्यांचा जवळपास 77 कोटी 50 लाखांचे… Continue reading शेतकरी वजनकाटा 33 लाखांचा : ऊस उत्पादकांना फायदा झाला 77 कोटींचा

कोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुण गौरव सोहळा संपन्न

केमिकल विभागाची वैष्णवी उलपे या वर्षीची बेस्ट आउटगोइंग स्टूडेंट वारणा ( प्रतिनिधी ) – तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमास) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सन २०२२-२३ चा गुण गौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात गतवर्षी शैक्षणीक क्षेत्रात विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करणाऱ्या २०० हुन अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.गुणगौरव कार्यक्रमांमध्ये… Continue reading कोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुण गौरव सोहळा संपन्न

बोटावरची शाई दाखवा ‘वडा फ्री’ : चाकणमध्ये मतदारांसाठी भन्नाट ऑफर

चाकण (प्रतिनिधी) : चाकणमध्ये नागरीकांनी अधिकाधिक मतदान करण्यासाठी यावे यासाठी खास ऑफर देण्यात आली आहे. या मतदारांसाठी चाकण शहरात नाष्ट्याची आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. बोटावरची शाई दाखवल्यानंतर या ऑफरचा लाभ मिळणार आहे. तर मतदारांनी त्यांचे शाई लावलेले बोट दाखवले तर एका वडापाववर एक वडापाव फ्री मिळणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे आणि निवडणूक… Continue reading बोटावरची शाई दाखवा ‘वडा फ्री’ : चाकणमध्ये मतदारांसाठी भन्नाट ऑफर

अभिनेता सलमान खानला एका अटीवर माफी देणार : बिष्णोई समाजाचे स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई अभिनेता सलमान खानच्या मागे हात धुवून लागली आहे. १९९८ साली केलेल्या काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानला अजूनही माफ केलेले नाही. काही दिवसांपूर्वीच सलमानच्या बांद्रा येथील गॅलक्सी या राहत्या अपार्टमेंटवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यामुळंसलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बिष्णोई समाज एका अटीवर सलमानला माफ करु शकतो असं समाजाच्या… Continue reading अभिनेता सलमान खानला एका अटीवर माफी देणार : बिष्णोई समाजाचे स्पष्टीकरण

सांगली, मिरज रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी ; अन् प्रवाशांनी सोडला सुटकेचे निश्वास

सांगली : मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दूरध्वनीवरुन आल्यानंतर सांगली पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी सांगली व मिरज स्थानकावर रात्रभर शोध मोहीम राबवत जागता पहारा ठेवला. यामुळे रात्रीच्या वेळी सांगली आणि मिरज स्टेशनवर प्रवासाला जायला आलेल्या प्रवाशांना एक वेगळाच अन् काहीसा भीतीदायक अनुभव आला.रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर अचानक पोलिसांचे डॉग आणि… Continue reading सांगली, मिरज रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी ; अन् प्रवाशांनी सोडला सुटकेचे निश्वास

सावकारकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कुरुंदवाड :  शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे (वय 44) या शेतकऱ्याने शेतातील गोठ्याच्या शेडमध्ये गळफास  घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि.13) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. मृत भालचंद्र यांच्या खिशातून पोलिसांना एक चिट्ठी मिळाली आहे. त्यामध्ये  सावकारांची नावे असून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा उल्लेख आहे. तसेच सावकारांच्‍या… Continue reading सावकारकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

यड्राव फाट्याजवळ भीषण अपघात : 10 जखमी, एका महिलेने गमावला जीव

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे आज (सोमवार) झालेल्या एका चारचाकीच्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी आहेत. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारदाळ येथील सनदी कुटुंबिय हे आपल्या नातेवाईकांकडे जात होते. यावेळी यड्राव येथे असणाऱ्या ओढ्याजवळ ही… Continue reading यड्राव फाट्याजवळ भीषण अपघात : 10 जखमी, एका महिलेने गमावला जीव

डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी बेंगळूर येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोला भेट दिली. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रो व त्या सबंधित संस्थांमधील संशोधकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. इस्रो आऊटरिच प्रोग्रॅम या अंतर्गत भारतीय अवकाश (अंतरीक्ष ) संशोधन संस्थेशी संलग्न यु.आर. राव सॅटेलाईट… Continue reading डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट

आरे येथे गवा रेड्याचा वावर ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

देवगड (प्रतिनिधी) – आता शिरगाव पाठोपाठ आरे गावामध्ये ही गवा रेड्यांचा वावर पाहायला मिळतोय. त्यामुळे येथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवार १२ मे रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास आरे गावातील बोडदेवाडी येथे बोडदेव मंदिर परिसरामध्ये गवारेडा पहायला मिळाला. सध्या आंबा व काजू पिकाचा हंगाम असल्याने गावातील लोक आपल्या काजू बागेत आंबा बागेत असतात.… Continue reading आरे येथे गवा रेड्याचा वावर ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

इचलकरंजीत एकाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून

इचलकरंजी : येथील गणेशनगरमधील राकेश धर्मा कांबळे (वय 32) या तरुणाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.इचलकरंजीतील  टोळक्याने पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून राकेश कांबळे याचा खून केला. ही घटना पंचगंगा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खुल्या जागेत रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. राकेश हा अत्याधुनिक यंत्रमागावर काम करीत होता.… Continue reading इचलकरंजीत एकाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून

error: Content is protected !!