गांधीनगर रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. पॉल यांची चौकशी व्हावी : दिपक नंदवानी

करवीर (प्रतिनिधी) :  गांधीनगर वसाहत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ विद्या पॉल यांच्या कारभाराची चौकशी व्हावी. त्यांच्या काळात झालेल्या कोव्हिडच्या लसीकरणाचीही चौकशी करून त्यांची बदली करण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी आणि सिव्हिल सर्जन यांच्याकडे सिंधी समाजाच्या विविध संघटना, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले असल्याचे आम आदमी पार्टीचे दीपक नंदवानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नंदवाणी म्हणाले की, या… Continue reading गांधीनगर रुग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. पॉल यांची चौकशी व्हावी : दिपक नंदवानी

होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर फिरत असल्यास कारवाई : प्रदीप उबाळे

टोप (प्रतिनिधी) :  शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरोली पुलाची, नागांव, टोप, मौजे वडगांव, हालोंडी ही गावे येतात. या गावातील व्यावसायिक, व्यापारी, सहकारी संस्था कर्मचारी नेहमी लोकांच्या संपर्कात असल्याने ते सुपर स्प्रेडर असू शकतात. या लोकांची कोरोना टेस्ट करणे गरजेचे आहे. तसेच होम क्वांरटाईन असेलले रूग्ण घराबाहेर फिरत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. असे हातकणंगले तहसिलदार… Continue reading होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर फिरत असल्यास कारवाई : प्रदीप उबाळे

शिवसेनेच्यावतीने पंचगंगा लसीकरण केंद्राला वैद्यकीय साहित्यांची मदत…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संयुक्त उत्तरेश्वर पेठ आणि शुक्रवार पेठ शिवसेनेच्या वतीने पंचगंगा लसीकरण केंद्रात काही आरोग्य साहित्यांची कमतरता आहे. येथील कर्मचारी लसीकरणाचे काम करण्याबरोबरच घरोघरी जाऊन स्वॅब घेणे, ऑक्सीमीटरने तपासणी करणे अशी कामे करतात. यासाठी संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष किशोर घाटगे, रियाज बागवान, सुरेश कदम, संजय देसाई, सनी अतिग्रे, राकेश पोवार यांनी… Continue reading शिवसेनेच्यावतीने पंचगंगा लसीकरण केंद्राला वैद्यकीय साहित्यांची मदत…

राजे फाउंडेशनच्या कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन… 

कागल (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजे फाउंडेशनच्या कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा  सौ. नवोदिता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर पंचवीस बेडचे कोविड केअर सेंटर काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. रुग्णांची होणारी गैरसोय दूर होण्यासाठी येथे आणखी पंचवीस बेड वाढवण्यात आले आहेत. या केअर सेंटरमध्ये दहा ऑक्सिजन बेडसह… Continue reading राजे फाउंडेशनच्या कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन… 

गगनबावडा तालुक्यात कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालयासाठी एकच डॉक्टर…

साळवण (संभाजी सुतार) : गगनबावडा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आणि कोव्हिड सेंटरसाटी एकच डॉक्टर असल्याने उपचारांसाठी रुग्णांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यावेळी गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करत असताना पुढील दरवजा बंद असलेला दिसून आला. तर ग्रामीण रुग्णालयातील ओपीडी बंद असल्याचे सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना वैद्यकिय अधिकारी… Continue reading गगनबावडा तालुक्यात कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालयासाठी एकच डॉक्टर…

श्रुतिका डायग्नोस्टिक सेंटरला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील महाराणा प्रताप चौक येथील श्रृतिका डायग्नोस्टीक सेंटरमध्ये कोव्हिड नियमांचे पालन तसेच एचआरसीटीसाठी जादा रक्कम घेत असल्याच्या तक्रारी आल्याने सहा.आयुक्त संदीप घार्गे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सेंटरमध्ये कोव्हिड संशयीत रुग्णांचे छातीचे एचआरसीटी स्कॅन केले जाते. येथे शहरातील विविध ठिकाणाहून रुग्ण डायग्नोस्टीक सेंटरमध्ये तपासणीसाठी येतात. याठिकाणी कोव्हिडचा प्रादुर्भाव होऊ… Continue reading श्रुतिका डायग्नोस्टिक सेंटरला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस…

डॉ. अशोक माने यांचा शिवार कोव्हिड सेंटरला मदतीचा हात…

हातकणंगले (प्रतिनिधी) : जि.प. सदस्य डॉ. अशोक माने यांनी जयसिंगपूर येथील शिवार कोव्हिड सेंटरला भेट दिली. या सेंटरला त्यांनी १०० पीपीई किट, १०० एन ९५ मास्क आणि इतर साहित्य असे २५ हजारांची मदत दिली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, सावकार मादनाईक, जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, संदीप कारंडे, सुहास राजमाने आदी उपस्थित होते.

आ. ऋतुराज पाटील यांची गिरगाव कोव्हिड सेंटरला भेट…

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : आ. ऋतुराज पाटील यांनी करवीर तालुक्यातील गिरगांव कोव्हिड सेंटरला भेट देऊन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून १० लिटर क्षमतेचा ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून दिला. या माध्यमातून येथे येणाऱ्या कोरोना रुग्णांची सोय होणार आहे. यावेळी आ.पाटील यांनी उपलब्ध सुविधांची पाहणी केली. यावेळी आ.ऋतुराज पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात गिरगांवमधील युवकांनी पुढाकार घेऊन… Continue reading आ. ऋतुराज पाटील यांची गिरगाव कोव्हिड सेंटरला भेट…

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात १,५४२ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,५४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (मंगळवार) दिवसभरात ९६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  ५,६०८ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३२५, आजरा तालुक्यातील ३६, भुदरगड तालुक्यातील ४७, चंदगड तालुक्यातील ४५, गडहिंग्लज तालुक्यातील ९३, गगनबावडा… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात १,५४२ जणांना कोरोनाची लागण

मिशन वायू अंतर्गत २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध : आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वायू’ अंतर्गत आज २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आले. मिशन वायू मोहिमेच्या अंतर्गत आजअखेर एकूण ७० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ५ बायपॅक व्हेंटिलेटर मशीन कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत. कोल्हापुरातील कोरोनाच्या  रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आ.… Continue reading मिशन वायू अंतर्गत २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध : आ. ऋतुराज पाटील

error: Content is protected !!