राधानगरी, गारगोटीमध्ये ऑक्सिजन प्लँटसाठी ५० लाखांचा निधी मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या रुग्णांची संख्या शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे हॉस्पिटल, रुग्ण, त्यांचे नातेवाईकांना पळापळ करावी लागत आहे. यासाठी शासनामार्फत राधानगरी आणि गारगोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सीजन जनरेशन प्लँटची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी… Continue reading राधानगरी, गारगोटीमध्ये ऑक्सिजन प्लँटसाठी ५० लाखांचा निधी मंजूर : आ. प्रकाश आबिटकर

हेर्ले गावातील मोफत आरोग्य सेवेचा पॅटर्न जिल्ह्यात आदर्शवत : डॉ. प्रदीप पाटील

टोप (प्रतिनिधी) : हेर्ले गावात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी  उपकेंद्राच्या माध्यमातून केलेला मोफत आरोग्य सेवेचा हेर्ले पॅटर्न कोल्हापूर जिल्ह्यात आदर्शवत असेल. असे मत हातकणंगले पं. स. सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी व्यक्त केले. ते या केंद्राला दिलेल्या भेटीवेळी बोलत होते. हर्ले गावातील मेडिकल असोसिएशन, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोफत… Continue reading हेर्ले गावातील मोफत आरोग्य सेवेचा पॅटर्न जिल्ह्यात आदर्शवत : डॉ. प्रदीप पाटील

ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सीपीआरला प्रदान …

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आरोग्य विभागाला प्रदान करण्यात आले. सीपीआरसह जिल्ह्यातील कोरोना दवाखान्यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात ही मशीन्स सीपीआर प्रशासनाला प्रदान करण्यात आली. यावेळी ना. हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या संघर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना… Continue reading ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सीपीआरला प्रदान …

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात १,०९६ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,०९६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक गोष्ट अशी की आज (गुरुवार) दिवसभरात १,०७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ३,७८७ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २१८, आजरा तालुक्यातील १४, भुदरगड तालुक्यातील ३४, चंदगड तालुक्यातील ४,… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात १,०९६ जणांना कोरोनाची लागण

युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरला पालिकेची कारणे दाखवा नोटीस…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात फोर्ड कॉर्नर येथे असणाऱ्या युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये एचआरसीटीसाठी ज्यादा दर आकारल्याने सहा. आयुक्त चेतन कोंडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहरामध्ये एचआरसीटीसाठी ज्यादा दर आकारत असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ.बलकवडे यांनी शहरातील डायग्नोस्टीक सेंटरची अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले होते.… Continue reading युरेका डायग्नोस्टीक ॲण्ड रिसर्च सेंटरला पालिकेची कारणे दाखवा नोटीस…

भाजपा किसान मोर्चाचा सार्थकी कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना मदतीचा हात…

हातकणंगले (प्रतिनिधी) :  भाजपा किसान मोर्चाच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील पेठडगांव येथील छ. संभाजी राजे मेडिकल फाऊंडेशन संचालित सार्थकी मल्टीस्पेशालीटी अँड कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णांना २५ हजारांच्या वैद्यकीय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सॅनिटाईजर, पीपीई किट, मास्क आदी साहित्यांचे वाटप जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेठवडगांवचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते यावेळी जि.प.… Continue reading भाजपा किसान मोर्चाचा सार्थकी कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना मदतीचा हात…

घुणकी येथे राजवर्धन मोहिते फौंडेशनच्या वतीने कोव्हिड सेंटर सुरु…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे राजवर्धन मोहिते युवा फाऊंडेशनच्या वतीने ५० बेडचे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. जि. प. सदस्य अशोकराव माने यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी हातकणंगले सभापती डॉ. प्रदीप पाटील होते. यावेळी जि.प. सदस्य राजवर्धन मोहिते, धोंडीराम सिद,संभाजी पाटील, अशोकभाऊ जाधव, प्रभाकर कुरणे,प्रल्हाद पाटील,अविनाश मगदूम आदी उपस्थित… Continue reading घुणकी येथे राजवर्धन मोहिते फौंडेशनच्या वतीने कोव्हिड सेंटर सुरु…

खा. धैर्यशील माने यांना कोरोनाची लागण…

इचलकरंजी (प्रतिनिधी) : खासदार धैर्यशील माने यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना गेले दोन दिवस ताप होता. खबरदारी म्हणून त्यांनी कोरोना टेस्ट केल्यानंतर आज (बुधवार) त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यावेळी खा. माने यांनी, गेल्या दोन तीन दिवसांपासून कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने आज मी कोव्हिड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली… Continue reading खा. धैर्यशील माने यांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात १,१९९ जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,१९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज (बुधवार) दिवसभरात ८७२ जणांनी कोरोनावर मात केली असून ४,९४८ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २७०, आजरा तालुक्यातील ३१, भुदरगड तालुक्यातील २३, चंदगड तालुक्यातील ७, गडहिंग्लज तालुक्यातील ११७,… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात १,१९९ जणांना लागण

श्रमशक्ती संस्थेचे कार्य कौतुकास्पद : डॉ. विकास खरात

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेने कोरोची गाव आणि परिसरासाठी शववाहिका लोकर्पण सोहळा प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर तहसिलदार शरद पाटील, जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, पं. स. सदस्य पूनम भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोचीत श्रम शक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेने कोरोची गाव आणि परिसरासाठी कोरोनामुळे होणाऱ्या मृत… Continue reading श्रमशक्ती संस्थेचे कार्य कौतुकास्पद : डॉ. विकास खरात

error: Content is protected !!