कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन वायू’ अंतर्गत आज २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आले. मिशन वायू मोहिमेच्या अंतर्गत आजअखेर एकूण ७० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ५ बायपॅक व्हेंटिलेटर मशीन कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत. कोल्हापुरातील कोरोनाच्या  रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आ. ऋतुराज पाटील यांनी सांगितले.