जिल्ह्यात १,८५५ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. मागील चोवीस तासांत एकूण १,८५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवार) १,३६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तब्बल ९,३२९ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ५४६, आजरा ७३, भुदरगड ३८,… Continue reading जिल्ह्यात १,८५५ जणांना कोरोनाची लागण…

आर.के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण…

पाचगांव (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे लसीकरण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून हे लसीकरण झाले. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या काळात ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्रशासनानेही महत्त्व दिले… Continue reading आर.के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण पूर्ण…

‘त्या’मुळेच जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाहीच..?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील आठवड्यापासून म्हणजे ५ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडपैकी रुग्ण असलेल्या बेडचं प्रमाण या आधारावर जिल्ह्यांची विभागणी ५ गटांमध्ये करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा सध्या ४ थ्या गटात आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी असली तरी पॉझिटिव्हिटी रेटमध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचल्याने पुढील… Continue reading ‘त्या’मुळेच जिल्ह्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाहीच..?

जिल्हा परिषदेला ‘मोबाईल मेडिकल युनिट’ सेवा प्राप्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कोल्हापूर जिल्हायातील आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांमध्ये आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने फिरते वैदयकीय पथक मोबाईल मेडिकल युनिट सेवा  प्राप्त झाली आहे. जिल्ह्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली मोबाईल मेडिकल युनिट  बस उपलब्ध झाली आहे. याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आरोग्य सेवेची आवश्यकता, साथरोग रुग्णांची… Continue reading जिल्हा परिषदेला ‘मोबाईल मेडिकल युनिट’ सेवा प्राप्त…

संघवी हॉस्पिटलमध्ये मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गेली ३५ वर्ष प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी या वैद्यकीय सेवेला सामाजिक उपक्रमाची सुद्धा जोड आहे. यातूनच त्यांनी आज (शुक्रवार) कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. डॉ. संघवी यांच्या या सामाजिक आणि वैद्यकीय सेवेचा आदर्श सर्वाना… Continue reading संघवी हॉस्पिटलमध्ये मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध…

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच :  ३७ जणांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील चोवीस एकूण १४९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १९५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४११, आजरा-७१, भुदरगड-५२, चंदगड-२७, गडहिंग्लज-५३, गगनबावडा-४, हातकणंगले-१४५, कागल-६९,  करवीर-२४०, पन्हाळा-१०८, राधानगरी-३६, शाहूवाडी-२१, शिरोळ-९२, नगरपरिषद क्षेत्र-१२०, इतर… Continue reading जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच :  ३७ जणांचा मृत्यू

गारगोटीत रस्त्यावरच अनेक नागरिकांची अचानक कोरोना चाचणी…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुका प्रशासनाने आज सकाळी दीडशेहून अधिक नागरिकांची अचानक कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. या अचानक चाचणीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. आज (गुरुवार) गारगोटी येथे क्रांतीज्योतीसमोर अचानक कोविड चाचणी केंद्राची रुग्णवाहिका उभी राहिली.  त्यातून पीपीई किट घातलेले वैद्यकीय कर्मचारी उतरले. प्रशासनाच्या सहाय्याने त्यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणारे लोक,… Continue reading गारगोटीत रस्त्यावरच अनेक नागरिकांची अचानक कोरोना चाचणी…

जिल्ह्यात दिवसभरात १,७२८ जण कोरोनामुक्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,५१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) दिवसभरात १,७२८ जण कोरोनामुक्त झाले असून ६,८६० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४०७, आजरा तालुक्यातील ५३, भुदरगड तालुक्यातील ३५, चंदगड तालुक्यातील ३०, गडहिंग्लज तालुक्यातील ५१, गगनबावडा तालुक्यातील… Continue reading जिल्ह्यात दिवसभरात १,७२८ जण कोरोनामुक्त…

टोप गावात १२ जूनपासून दहा दिवस जनता कर्फ्यू…

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून गावातील सर्वच भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे आज (बुधवार) दक्षता समितीच्या झालेल्या बैठकीत अत्यावश्यक सेवा वगळुन गावात १२ जून पासून दहा दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. टोप गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १०० जणांना कोरोनाची लागण झाली असून काही संशयित रुग्ण… Continue reading टोप गावात १२ जूनपासून दहा दिवस जनता कर्फ्यू…

राज्यातील पहिले लहान मुलांचे कोव्हिड सेंटर माणगांवमध्ये सुरू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील पहिल्या ग्रामपंचायत संचलित लहान मुलांच्या कोव्हिड सेंटर हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन माजी खासदार राजू शेटटी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आ. प्रकाश आवाडे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी विकास खरात, हातकंणगले तहसिलदार उबाळे, जयसिंगपूर नगराध्यक्ष निता माने,… Continue reading राज्यातील पहिले लहान मुलांचे कोव्हिड सेंटर माणगांवमध्ये सुरू…

error: Content is protected !!