पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय नाही : वर्षा गायकवाड

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने विद्यार्थी व शिक्षक कोरोनाने संक्रमित झाले नाहीत. आरोग्य विषयक सुचनांचे पालन करूनच नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. कारण हे विद्यार्थी प्राथमिक विभागातील मुलांपेक्षा अधिक जागरूक व सजग असतात. लहान मुलांना शाळेत सामाजिक… Continue reading पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय नाही : वर्षा गायकवाड

‘या’ राज्याचा मोठा निर्णय : पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालपाठोपाठ मध्य प्रदेश सरकारनेही सर्व सरकारी आणि खासगी शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्रोजेक्टच्या आधारावर केले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री इंद्रसिंह परमार यांनी दिली. परमार यांनी सांगितले की, यावर्षी… Continue reading ‘या’ राज्याचा मोठा निर्णय : पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द

…तर महाविद्यालयांवर कारवाई होणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हे महाविद्यालयांचे कामच आहे, जर एखाद्या महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे शासनाच्या शिष्यवृत्ती लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे प्रस्तावित करावे, अशा सक्त सूचना राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिल्या. पुणे विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रादेशिक उपायुक्त कार्यालयात आढावा बैठक झाली.… Continue reading …तर महाविद्यालयांवर कारवाई होणार

कोल्हापुरातील शाळांची प्रशासकांनी केली पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोल्हापूर शहरात शाळा सुरु आहेत का, याची पाहणी आज (सोमवार) प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केली. यावेळी त्यांनी शहरातील दोन शाळांना अचानक भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप शाळा सुरू नाहीत. परंतु पालकांचे हमीपत्र घेऊन काही माध्यमिक शाळा शहरात सुरू झालेल्या आहेत. या शाळांची पाहणी त्यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त… Continue reading कोल्हापुरातील शाळांची प्रशासकांनी केली पाहणी

दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा..?

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा-कॉलेजेस बंद असल्या कारणाने ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत अध्यापन प्रक्रिया बदलली असून यासाठी तंत्रज्ञान फोरम तयार करण्यात येणार आहे. शाळेतील शिक्षक, शिक्षण तज्ञ, शिक्षण अधिकारी, एनसीआरटी व बालभारतीच्या संयुक्तपणे शिक्षण क्षैत्रातील बदलांचा व नव्या आव्हानांचा आढावा घेत… Continue reading दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा..?

वालावलकर हायस्कूलमध्ये महात्मा फुले यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील  आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित मुक्त सैनिक विद्यापीठांतर्गत असणाऱ्या शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये आज (शनिवार) महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकार यांनी महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रतिमेस पुष्पाहार अर्पण केला. इयत्ता सातवीच्या वर्गशिक्षिका पल्लवी गंगधर यांनी महात्मा फुले यांचा… Continue reading वालावलकर हायस्कूलमध्ये महात्मा फुले यांना अभिवादन

जिल्हा परिषदेला मुदतपूर्व प्रस्ताव देऊनही स्वयंअर्थसहाय्यित शाळा उपेक्षितच : शिक्षकांवर उपासमारीची वेळ

कोल्हापूर (उत्तम पाटील) : स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील २५% फी गेले कित्येक वर्ष कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळांना मिळाली नसल्यामुळे शिक्षकांचे पगार कसे होणार याचा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आरटीई अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित २५% विद्यार्थ्यांना प्रतीपूर्ती रक्कम अदा केली जाते. पण बऱ्याच शाळांचे प्रस्ताव हे वेळेत देऊनही अजूनही जिल्हा परिषदेकडून त्यांची रक्कम दिली गेली… Continue reading जिल्हा परिषदेला मुदतपूर्व प्रस्ताव देऊनही स्वयंअर्थसहाय्यित शाळा उपेक्षितच : शिक्षकांवर उपासमारीची वेळ

धक्कादायक : कोल्हापुरातील ५८ शिक्षक कोरोनाग्रस्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नववी ते बारावीपर्यंतची शाळा सुरू झाल्याने शिक्षकांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. चाचणी मोहिमेत ५८ शिक्षकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. एकाच दिवसांत १० शिक्षकांना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कोरोना चाचणीसाठी गेल्यानंतर शिक्षकांच्या ह्रदयाचा ठोका चुकत आहे. पॉझिटिव्ह शिक्षकांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. ते कोरोना चाचणी न करता अध्यापनास गेले… Continue reading धक्कादायक : कोल्हापुरातील ५८ शिक्षक कोरोनाग्रस्त…

शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु : अजित पवार

कराड (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) येथे दिली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त  कराड येथील प्रीतीसंगम येथे चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्यांनी  श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की,  सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबर… Continue reading शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु : अजित पवार

परिपूर्ण तयारी करुनच शाळा सुरू करण्याचे नियोजन करा : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सर्व शाळांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींची परिपूर्ण तयारी करुनच शाळा सुरू करण्याचे नियोजन करा, शाळेने केलेल्या तयारीची पाहणी महानगरपालिकेकडील नियंत्रण अधिकारी समक्ष भेट देऊन करतील, नंतरच शाळा सुरू करण्याबाबतची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळामध्ये सुरू असलेल्या… Continue reading परिपूर्ण तयारी करुनच शाळा सुरू करण्याचे नियोजन करा : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

error: Content is protected !!