पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या साई सर्व्हीस शोरूमजवळ अज्ञात वहानाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गजानन लक्ष्मण उनाळे (वय ४०, रा. शिवाजीनगर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात काल (मंगळवार) रात्री उशीरा घडला. याबाबत शिरोली पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार स्वरुप उनाळे यांनी पोलिसात… Continue reading पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

घरपण येथे जागेच्या वादातून दोन कुटूंबात राडा : सहा जखमी

कळे (प्रतिनिधी) : घरपण येथे दोन गटांमध्ये तूफान राडा झाला. यामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, घरपण येथील सुनिल विष्णू मोळे (वय ४२) आणि बंडोपंत कृष्णा बिडकर (वय ७०) यांच्यात घराशेजारील जागेवरून वाद सुरु आहे. त्यातून त्यांच्यात आज पुन्हा वाद झाला.  यावेळी… Continue reading घरपण येथे जागेच्या वादातून दोन कुटूंबात राडा : सहा जखमी

घृणास्पद : मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार   

कळे (प्रतिनिधी) : मावस मामाने अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निलेश नामदेव पाटील (रा. काटेभोगाव, ता. पन्हाळा) याच्याविरोधात कळे पोलीस ठाण्यामध्ये आज (बुधवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसरूळ (ता.पन्हाळा) येथील १४ वर्षीय पीडित बालिका आपल्या मावशीकडे विरार (मुंबई) येथे राहण्यासाठी… Continue reading घृणास्पद : मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार   

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार : एकावर गुन्हा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पिडीत महिलेने प्रकाश बंडोपंत पाटील रा. आपटेनगर याच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत महिला आणि प्रकाश पाटील हे गेल्या तेवीस वर्षांपासून एकमेंकांना ओळखतात. प्रकाश पाटील याने पिडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शाररिक संबंध ठेवले. यावेळी… Continue reading लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार : एकावर गुन्हा

जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातील चंदनाच्या झाडाची चोरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातील न्यायाधीशांच्या निवास स्थानाजवळील असणारे सुमारे १० हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड चोरट्यांनी कापून लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महादेव शिवगोंडा पाटील (वय ५७, रा. पोलीस मुख्यालय) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कसबा बावडा रोडवरील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातील न्यायाधीशांच्या… Continue reading जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातील चंदनाच्या झाडाची चोरी

वडणगेत बंगला फोडून ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वडणगे येथील एका बंगल्याच्या खिडकीचे गज उचकटून चोरट्यांनी सुमारे ४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी अनिल राजाराम सादुले (वय ५५, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांनी करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उत्तरेश्वर पेठ येथे राहणारे अनिल सादुले यांचा वडणगे येथेही एक बंगला आहे. ते… Continue reading वडणगेत बंगला फोडून ४ लाखांचा मुद्देमाल लंपास

‘या’ दोघांना तात्काळ अटक करा : शैलेश बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका प्रकरणातील मोक्याची कारवाईमध्ये सध्या फरारी असलेला कोल्हापूरातील सम्राट कोराणे आणि इचलकरंजीतील संजय तेलनाडे या दोघांच्या शोधासाठी दोन नव्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इचलकरंजी येथील गावभाग शिवाजीनगर आणि शहापूर या तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व अवैध व्यवसाय… Continue reading ‘या’ दोघांना तात्काळ अटक करा : शैलेश बलकवडे

रेसकोर्स नाक्याजवळील तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रेसकोर्स नाक्याजवळील सांस्कृतिक मंडळांमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. जुगार अड्डाचा मालक आणि जुगार खेळणाऱ्या १५ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि मोटरसायकल असा दोन लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेसकोर्स नाक्याजवळील साई… Continue reading रेसकोर्स नाक्याजवळील तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा

घरातून लाखो रुपये किंमतीचा ऐवज लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वृद्ध महिला घर कामामध्ये असताना भरदिवसा चोरट्यांनी महिलेच्या घरात प्रवेश करून दोन तोळ्याचे गंठण आणि अर्धा तोळ्याची अंगठी, असा सुमारे लाखोंचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सुशिला अण्णासो पल्लके (वय ६५, मूळ रा. कुरुंदवाड, ताशी रोड, सध्या रा. फुलेवाडी सहाव्या बस स्टॉप जवळ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांकडून… Continue reading घरातून लाखो रुपये किंमतीचा ऐवज लंपास

पोलीस अधिकारी असल्याचे भासवत प्राचार्याचे पैसे, दागिने लंपास

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवत दोघा भामट्यांनी निवृत्त प्राचार्याकडील ५० हजारांची रोकड, सोन्याची चैन आणि अंगठी असा सुमारे १ लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भगवान भैरु चौगुले (वय ७४, रा. हिम्मत बहादुर, ताराबाई पार्क) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भगवान चौगुले यांचे मित्र… Continue reading पोलीस अधिकारी असल्याचे भासवत प्राचार्याचे पैसे, दागिने लंपास

error: Content is protected !!