सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बंदिस्त सभागृहे किंवा मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळून सुरू करण्यास परवानगी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. दौलत देसाई यांनी सांगितले की, चित्रपट, नाटक वगळता बंदिस्त सभागृह व इतर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश देताना थर्मल टेस्टव्दारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी… Continue reading सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी : जिल्हाधिकारी

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेबाबत महेश कोठारेंचे मोठे आश्वासन..

वाडीरत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली कोठारे व्हिजन प्रस्तुत ‘दख्खनचा राजा  जोतिबा’ ही मालिका तिच्या कथानकामुळे वादात सापडली आहे. या मालिकेमधील कथा ही मूळ केदार विजय ग्रंथाला अनुसरून नाही, तसेच यामधील भाषा, वेशभूषा देखील मालिकेला साजेशी दिसून येत नाही, असे पुजारी आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी श्री क्षेत्र जोतिबा डोंगर, वाडीरत्नागिरी… Continue reading ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेबाबत महेश कोठारेंचे मोठे आश्वासन..

श्री अंबाबाई मंदिरात रोज ‘एवढ्याच’ भाविकांना मिळणार दर्शन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर उद्यापासून (सोमवार) भाविकांना दर्शनासाठी खुले होत आहे. पण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन टप्यात रोज केवळ ३ हजार भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल. मंदिरात प्रवेश दिल्यानंतरही पितळी उंबऱ्यापर्यंतच भाविकांना दर्शनासाठी सोडले जाईल. आणखी काही दिवस गाभाऱ्यातून प्रवेश बंद राहील, अशी माहिती पश्चिम… Continue reading श्री अंबाबाई मंदिरात रोज ‘एवढ्याच’ भाविकांना मिळणार दर्शन…

‘यावेळी’ करा भाऊबीज साजरी..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला दिवस म्हणजे भाऊबीज. हा दिवस बहिण – भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या पाचव्या दिवशी हा सण येतो. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या सुखी, समृद्धी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यंदा १६ नोव्हेंबरला हा सण आला आहे. या दिवशी भावाला औक्षण करण्यासाठी… Continue reading ‘यावेळी’ करा भाऊबीज साजरी..

‘लागिरं झालं जी’ मालिकेमधील ‘जिजी’ काळाच्या पडद्याआड

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका कमल ठोके यांचे   शनिवारी (दि.१४) बंगळुरू येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ऐन दिवाळी दिवशी  त्यांचे निधन झाल्याने मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. झी मराठीवरील  लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील त्यांनी ‘जिजी’ नावाची आजीबाईची  व्यक्तीरेखा… Continue reading ‘लागिरं झालं जी’ मालिकेमधील ‘जिजी’ काळाच्या पडद्याआड

फूटवेअर क्षेत्रातील विश्वसनीय नाव : अभ्यंकर फूटवेअर (व्हिडिओ)

तब्बल ५२ वर्षे फुटवेअर क्षेत्रात दर्जेदार, विश्वसनीय उत्पादनांची मालिका निर्माण करून कोल्हापूरचे नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या अभ्यंकर फूटवेअर प्रा. लि. च्या दुकानांमध्ये दिवाळीनिमित्त आणखी नवनव्या व्हरायटी उपलब्ध आहेत. तुम्हीही या, पहा अन् खरेदी करा…  

दिवाळी २०२० : ‘यावेळी’ करा लक्ष्मीपूजन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. यंदा १४ नोव्हेंबर (शनिवार) लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी धनलक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. तसेच धनदेवता कुबेराची देखील आराधना केली जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात.  लक्ष्मीपूजनच्या दिवशी… Continue reading दिवाळी २०२० : ‘यावेळी’ करा लक्ष्मीपूजन…

उत्कृष्ट दर्जा अन् ग्राहकसेवेचं व्रत जपणारं मिठाई दुकान : राजपुरोहित स्वीटस्

कोल्हापूरकरांची ‘चव’ जाणून नेहमी स्वादिष्ट, लज्जतदार मिठाई, ड्रायफ्रूटचे विविध प्रकार उपलब्ध करून देणाऱ्या ‘राजपुरोहित स्वीटस्’ या राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील दुकानात ग्राहकांची गर्दी होतेय. उत्कृष्ट दर्जा अन् ग्राहकसेवेचं व्रत जपणाऱ्या या दुकानाला आपणही भेट द्या…  

धक्कादायक : सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

धर्मशाला (वृत्तसंस्था) : बॉलीवूडसाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले आहे. इरफान खान, ऋषी कपूर या गुणी अभिनेत्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला तर उमदा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली. सुशांतसिंगबरोबर ‘कैपोचे’ चित्रपटात काम केलेल्या आसिफ बसरा या अभिनेत्याने आज (गुरुवार) आत्महत्या केली. ते ५३ वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला येथील मॅकलॉडगंजमधील जोगीबाडा रोडवरील कॅफेजवळ असलेल्या घरात… Continue reading धक्कादायक : सुशांतसिंहसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या

व्यवसायातील सचोटीसह सामाजिक बांधिलकी जपणारं वस्त्रदालन : वालावलकर कापड दुकान (व्हिडिओ)

कोल्हापुरात ८५ वर्षांपासून सचोटीने व्यवसाय करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न लक्ष्मी रोडवरील ‘शां. कृ. पंत वालावलकर कापड दुकान ट्रस्ट’ने केला आहे. दीपावलीनिमित्त या दुकानात आबालवृद्ध ग्राहकांसाठी दर्जेदार वस्त्रे उपलब्ध आहेत. एकवार भेट द्याच…  

error: Content is protected !!