कोल्हापूर (प्रतिनिधी) : संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने केशवराव भोसले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी केशवराव भोसले नाटयगृह येथील केशवराव भोसले यांच्या प्रतिमेस महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी व्यवस्थापक समीर महाब्री, कै. केशवराव भोसले यांचे नातू राजशेखर भोसले, आदी उपस्थित होते.