अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

सांगोला तालुक्यातून ११ लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त सांगोला :  सांगोला तालुक्यात ११ लाख रुपये किमतीची गोवा निर्मित दारु राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत पकडली आहे. सतत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अलीकडे अशा कारवाया होत असून गोव्यातून महाराष्ट्रात आणण्यास प्रतिबंध असलेली दारु पकडली जात आहे. या कारवाईमुळे चोरट्या व्यावसायिकांनी धसका घेतलेला असतानाच सांगोला… Continue reading अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई

आपुलकी प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

श्रीमती लक्ष्मी लठ्ठे, शाम पवार, विनोद बेले, चंद्रकांत पाटील व इनरव्हील क्लबला पुरस्कार प्रदान सांगोला (प्रतिनिधी ) आपुलकी प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. भारुडाची जुगलबंदी, पुरस्कार वितरण व “दारू नको दूध प्या” असे विविध उपक्रम आपुलकीच्या वतीने घेण्यात आले. आपुलकी प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नववर्षाच्या पूर्वसंध्येला सांगोला येथील छ. शिवाजी… Continue reading आपुलकी प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सांगोल्याच्या मुख्याधिकारीपदी सुधीर गवळी

सांगोला/ प्रतिनिधी- कैलास केंद्रे यांची आळंदी नगरपरिषदेत बदली सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची आळंदी नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी जालना जिल्ह्यातील परतूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा मुलींना स्वसंरक्षणासाठी ऑपरेशन दुर्गा, ज्येष्ठांसाठी ३ टक्के निधीची तरतूद, हर घर तिरंगा, वृक्ष बँक, ई-बाईक कट्टा, कचऱ्यापासून खतनिर्मिती… Continue reading सांगोल्याच्या मुख्याधिकारीपदी सुधीर गवळी

प्रा.डॉ. किसान माने लिखित ” राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख” या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

सांगोला//नाना हलांगडे स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या जीवन कार्यावरील प्रा. डॉ. किसन माने लिखित राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख या चरित्रग्रंथाचे रविवार दिनांक १ जानेवारी, 2023 रोजी सकाळी ११.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल) सांगोला येथे प्रकाशन समारंभाचे आयोजन केले आहे. सदर प्रकाशन समारंभ श्रीमती रतनबाई (बाईसाहेब) गणपतराव देशमुख यांच्या शुभहस्ते… Continue reading प्रा.डॉ. किसान माने लिखित ” राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख” या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

उदनवाडीत लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार

५० हजार रुपयाचे नुकसान; वन विभागाने केला पंचनामा सांगोला/ नाना हालंगडे- सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील काळ्या मळ्यातील एका पशुपालकाच्या घराजवळील वाड्यावर हल्ला केल्याने,पाच शेळ्या जागीच मृत्यू झाल्या आहेत.ही घटना मंगळवार 27 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजनेच्या सुमारास घडली आहे. याबाबत माहिती अशी की,येथील काळ्यामळ्यात बाळू ईश्वर सरगर हे आपल्या शेतात राहत आहेत.त्यांच्याकडे मोठ्या पशुधनासह सात… Continue reading उदनवाडीत लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार

शेकापचा झेंडा डौलाने फडकविण्याचा निर्धार

सांगोला (प्रतिनिधी) : सर्वसामान्य लोकांची आजही शेतकरी कामगार पक्षावर विश्वास व निष्ठा आहे. स्व. आबासाहेबांनी सांगोला तालुक्याचा शाश्वत विकास केला आहे. तालुक्याचा विकास शेकापने केला आहे हे कोणी ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भरवशावर आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेकापने यशस्वी घोडदौड केली असून, येणार्‍या सर्व निवडणुकीमध्ये शेकापचा लालबावटा डौलाने फडवण्याचा निर्धार शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिंतन… Continue reading शेकापचा झेंडा डौलाने फडकविण्याचा निर्धार

अवैध वाळूचा पिकअप पकडून २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला (प्रतिनिधी) : अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारे पिकअप पोलिसांनी पकडला असून, ही कारवाई मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या पथकाने केली. अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा पिकअप पकडून एक ब्रास वाळूसह २ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक सुनील मोरे यांनी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद… Continue reading अवैध वाळूचा पिकअप पकडून २.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

सांगोला (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने निघालेल्या कारने दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात ५५ वर्षीय भांडी व्यावसायिकाचा ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. हा सांगोला-पंढरपूर रस्त्यावर संगेवाडी येथील खंडागळे वस्तीसमोर हा अपघात झाला. शहाजी चिनाप्पा पवार (५५, रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) असे मरण पावलेल्याचे नाव असून, भाऊ लक्ष्मण चिनाप्पा पवार यांनी फिर्याद दिली… Continue reading दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

एसटी बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेचे मिनी गंठण लांबवले

सांगोला (प्रतिनिधी) : एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्ध महिलेच्या गळ्यातील २५ हजारांचे सोन्याचे सव्वा तोळ्याचे मिनी गंठण लंपास केले. ही घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास सांगोला बसस्थानकावर घडली. याबाबत कुसुम दगडू कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पंढरपूर तालुक्यात करकंब येथील कुसुम दगडू कांबळे ह्या वृद्ध महिलेस सांगोला तालुक्यात जवळा येथे जायचे असल्याने… Continue reading एसटी बसमध्ये चढणाऱ्या वृद्धेचे मिनी गंठण लांबवले

बापू-आबांचा जलवा, लाल बावटाही तोऱ्यात

सांगोला (नाना हालंगडे) : राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत असलेल्या सांगोला तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमचीच सरशी झाली असा सूर राजकीय पक्षांकडून आळविण्यात येऊ लागला आहे. तालुक्यातील एकूण सहा ग्रामपंचायतींपैकी शेकापने दोन ग्रामपंचायतींवर झेंडा रोवला आहे. तर दुसरीकडे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील आणि विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटाने ३ ग्रामपंचायती जिंकल्याचे सांगण्यात येत… Continue reading बापू-आबांचा जलवा, लाल बावटाही तोऱ्यात

error: Content is protected !!