शिंदेंना दणका, कल्याण जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

कल्याण : महाराष्ट्र लोकसभेसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्या आधी कल्याणमध्ये मोठी घडामोड घडली आहे. . शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी नाराजी नाट्य समोर आल्याने आता कल्याणच्या राजकारणात मोठा… Continue reading शिंदेंना दणका, कल्याण जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

पुन्हा मागे तसे पुढे ! ज्या ठिकाणी जीव गेले त्याच ठिकाणी होर्डिंग

पुणे : मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी रात्री महाकाय होर्डिंग कोसळून 14 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.ही घटना ताजी असतानाच पुण्यातील होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील धोकादायक होर्डिग कोसळून निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. या दुर्घटनेनंतरही प्रशासनाला घटनेचे गांभीर्य नसल्याचे जागोजागी उभारलेल्या होर्डिंगवरून दिसत आहे. महापालिका हद्दीत… Continue reading पुन्हा मागे तसे पुढे ! ज्या ठिकाणी जीव गेले त्याच ठिकाणी होर्डिंग

‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते  प्रफुल पटेल यांनी काल केलेल्या कृत्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे.प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जिरेटोप घातल्यानं शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता.या प्रकरणावर आता प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेशी घट्ट बांधला जाणारा जिरेटोप प्रफुल पटेल… Continue reading ‘त्या’ कृत्यावर प्रफुल पटेलांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

पंतप्रधान मोदी जिथे जाणार, तिथे मविआ जिंकणार : संजय राऊतांचा दावा

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 13 मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर 20 मे ला पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा आज मुंबई उपनगरातील घाटकोपरमध्ये रोड शो होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीने देशाच्या पंतप्रधानांना रस्त्यावर… Continue reading पंतप्रधान मोदी जिथे जाणार, तिथे मविआ जिंकणार : संजय राऊतांचा दावा

वाकोल्यात शिंदे – ठाकरे गटात राडा

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर राज्यातील शिवसैनिक दोन गटात विभागाला गेला.काही जणांनी उद्धव ठाकरे  यांची साथ कायम ठेवली तर काही जणांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. मंगळवारी वाकोल्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाल्याच पाहायला मिळालं. भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम आणि नीलम गोऱ्हे यांच्या सभेनंतर हा वाद झाला.… Continue reading वाकोल्यात शिंदे – ठाकरे गटात राडा

प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर शिवरायांचा जिरेटोप चढवून शिवभक्तांचा अपमान केला : नाना पटोले

मुंबई : हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणा-या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागावी, अशी… Continue reading प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर शिवरायांचा जिरेटोप चढवून शिवभक्तांचा अपमान केला : नाना पटोले

‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

मुंबई – सध्या देशात लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र जोरदार प्रचार सुरु आहे. देशातील चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदानाचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी येथे जाऊन वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रॉड शो आहे. पंतप्रधान… Continue reading ‘पंतप्रधान मोदी मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी’ ; संजय राऊतांची मोदींवर टीका

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

जळगाव: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडे सुरक्षा रक्षक महणून काम करणाऱ्या एका एसआरपीएफ जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रकाश कापडे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याने जळगाव जिल्ह्यात जामनेर येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती पसरताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली.प्रकाश कापडे हे मुंबईत… Continue reading सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

आवाडे समर्थकावर इचलकरंजीत कोयत्याने वार

इचलकरंजी : क्रिकेटच्या जुन्या वादातून दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पाठलाग  करून एका दिवाणजीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरज अशोककुमार राठी (वय 32, रा. नारायण पेठ) असे जखमी युवकाचे नाव असून तो आवाडे समर्थक कार्यकर्ता आहे. याप्रकरणी प्रणव माणकर, समर्थ राजकुमार जाधव (दोघे रा. इचलकरंजी) या दोघांना शिवाजीनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.… Continue reading आवाडे समर्थकावर इचलकरंजीत कोयत्याने वार

दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

दिल्ली : दिल्लीतून एक मोठी घटना समोर येत आहे. येथील आयकर विभागाच्या कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या मागे आयकर विभागाची इमारत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे.दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाच्या इमारतीला दुपारी आग लागली आहे. ही आग मोठी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.… Continue reading दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग

error: Content is protected !!