कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस

मुंबई : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत. रामदास तडस यांनी राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन… Continue reading कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस

अकरावी प्रवेशाची पहिली यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

मुंबई / पुणे : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. अकरावीचा अर्ज पूर्ण भरण्यासाठी आता बुधवारपर्यंत वेळ मिळणार आहे. सध्या अकरावीचा प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, अर्ज भरण्यासाठी २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन… Continue reading अकरावी प्रवेशाची पहिली यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

बंडखोरांनी माझ्यासह लोकांचा विश्वासघात केला : उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : ‘तुमच्यामध्ये कर्तृत्व नाही, तुमच्यात हिंमत नाही. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मते मागा’, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर… Continue reading बंडखोरांनी माझ्यासह लोकांचा विश्वासघात केला : उद्धव ठाकरे

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार

मुंबई : आता राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १ ऑगस्टपासून राज्यभर सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यास… Continue reading मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार

नाना पटोले यांनी घेतली हंडोरे यांची भेट

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे पराभूत व्हावे लागलेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे  हे पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तसेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने हंडोरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वकीय काँग्रेस पक्षाच्या… Continue reading नाना पटोले यांनी घेतली हंडोरे यांची भेट

आदित्य ठाकरे आता जनतेला भेटू लागलेत : केसरकर

मुंबई (प्रतिनिधी) : ‘आज तुम्ही मुंबईमध्ये दिसायला लागला आहात. आज तुम्ही शाखांमध्ये फिरायला लागला आहात. कालपर्यंत हे कुठे फिरत नव्हते. हे युवासेनेचे प्रमुख आहेत. ते लोकांना दिसतही नव्हते. सातव्या मजल्यावर त्यांचे कार्यालय आहे. किती काळ ते ऑफिसमध्ये गेले. किती लोकांना भेटले? असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता… Continue reading आदित्य ठाकरे आता जनतेला भेटू लागलेत : केसरकर

बहुमत असूनही मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी)  : राज्यात बहुमताचे सरकार आहे. तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही?  हा जनतेचा अपमान आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यात बहुमताचे सरकार असताना अधिवेशन का घेतले जात नाही, अधिवेशन घ्यायला तुम्हाला कोणी अडवले आहे? असा प्रश्नही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. राज्यात सध्या पावसामुळे शेतकरी अडचणीत… Continue reading बहुमत असूनही मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही : अजित पवार

अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेही उपस्थित होते. मागील आठवडाभरापासून अर्जुन खोतकर दिल्लीत आहेत. आज त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार, खासदारही आले आहेत. मी शिवसेना सोडली… Continue reading अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा

आदित्य ठाकरे केंद्र सरकारच्या रडावरवर

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या रडावरवर युवासेनाप्रमुख आमि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. मोदी सरकारने आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरण मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे अनेकदा कौतुक झाले होते. परंतु, आता केंद्र सरकारने या सगळ्याची समीक्षा केल्यास त्यामधून… Continue reading आदित्य ठाकरे केंद्र सरकारच्या रडावरवर

शिंदे गट -भाजप सरकार आणि शिवसेना गटात मोठे युद्ध

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील राजकारणात शिंदे गट शिवसेना-भाजप सरकार आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटात मोठं युद्ध सुरू झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. सत्ता काबीज केल्यानंतर शिंदे गट आता शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह मिळवण्याच्या तयारीत आहे. याचच भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या अनुयायांशी… Continue reading शिंदे गट -भाजप सरकार आणि शिवसेना गटात मोठे युद्ध

error: Content is protected !!