राज्यात अनंत चतुर्दशीला पावसाचा जोर वाढणार

मुंबई (प्रतिनिधी) : ऑगस्ट महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला संततधार सुरू केली. गौरी गणपतीच्या विसर्जनादिवशी कोकणासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता अनंत चतुर्दशीला म्हणजेच शुक्रवारी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद,… Continue reading राज्यात अनंत चतुर्दशीला पावसाचा जोर वाढणार

शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आज (मंगळवार) दुपारी ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. जोरदार पावसामुळे गणेश मंडळाची एकच तारांबळ उडाली. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सकाळपासून उष्म्याने नागरिकांना हैराण केले होते. शहर आणि जिल्ह्यात दुपारी ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरुवात… Continue reading शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

कुंभोज येथे टॉवरवर वीज पडून १० टीव्ही संच जळाले

कुंभोज (प्रतिनिधी) : येथे बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे बाजारपेठेतील मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने विविध घरांतील १० टीव्ही संच जळाले. यात एक लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले. कुंभोज परिसरात रात्री अचानक वारा व विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस झाला. यामध्ये मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने संतोष माळी, विनायक माळी, अमोल कळंत्रे, विश्वनाथ बनणे, रमजान… Continue reading कुंभोज येथे टॉवरवर वीज पडून १० टीव्ही संच जळाले

पुण्यात गणरायाच्या आगमनाला पावसाची जोरदार हजेरी

पुणे (प्रतिनिधी) : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गणेशाच्या आगमनाच्या दिवशी दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी उशिरापर्यंत शहराच्या काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशाच्या मिरवणुका आणि प्रतिष्ठापना दुपारपर्यंत पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे त्यात पावसाचा अडथळा आला नाही; मात्र दुपारनंतरही मिरवणुका असलेल्या मंडळांना त्याचा काहीसा फटका बसला असला, तरी… Continue reading पुण्यात गणरायाच्या आगमनाला पावसाची जोरदार हजेरी

राज्यात १५ दिवस आधीच मान्सून घेणार ब्रेक

मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून धुवांधार पाऊस झाला आहे. अशात आता मान्सूनसंबंधी हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा १५ दिवस आधीच पाऊस निरोप घेण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम असताना आता मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास… Continue reading राज्यात १५ दिवस आधीच मान्सून घेणार ब्रेक

धामणी खोऱ्यातील काही गावांना बेटाचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत

कळे (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम पन्हाळा परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कुंभी, धामणी, सरस्वती नद्यांचे पाणीपात्राबाहेर पडून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अणदूर, कोदे, वेसरफ लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. कोल्हापूर-गगनबावडा मार्ग व कोल्हापूर-अणुस्कुरा मार्गावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद होती, ती आता पूर्ववत सुरू झाली आहे. अद्यापही काही ठिकाणी रस्त्यालगत पाणी… Continue reading धामणी खोऱ्यातील काही गावांना बेटाचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत

कोयना धरण ८०.९७ टक्के भरले

कराड (प्रतिनिधी) : कोयना धरणाची पाणीपातळी २ हजार १४७ फुटांवर गेली असून, एकूण पाणीसाठा ८५.३१ टीएमसी झाला आहे. धरण आतापर्यंत ८०.९७ टक्के भरले आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी आज (शुक्रवारी) सकाळी दहा वाजल्यापासून धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहेत. त्यामुळे ८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. गुरुवारी दुपारी… Continue reading कोयना धरण ८०.९७ टक्के भरले

छप्पर उडून, सुमारे दीड लाखाचे नुकसान

कळे (प्रतिनिधी) : येथील व्यापारी अशोक शंकर जाधव यांच्या घरावरील छप्पर वादळी वाऱ्याने रात्री  उडून गेले. तसेच त्यांच्या दुकानातील साहित्य भिजून नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. छताचे व साहित्याचे मिळून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर कमी असला तरी वादळी वारे जोरात सुटले आहे. अशोक जाधव यांचे कळे येथे आंबेडकर मार्गावर… Continue reading छप्पर उडून, सुमारे दीड लाखाचे नुकसान

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये सुरु असणाऱ्या संततधार पावसाने आज विश्रांती घेतली असली तरी पुराचा धोका अजूनही कायम आहे. शहरातील एकूण ७५ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची पातळी स्थिर आहे. राधानगरी धरणाचे आज (शुक्रवार) सकाळी स्वयंचलित तीन नंबरचा, तर दुपारी ४ नंबरचा दरवाजा बंद झाला आहे, तर ५, ६ व ७ हे तीन दरवाजे अजूनही उघडे… Continue reading राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद

आंबर्डे येथे घरावर झाड पडून लाखाचे नुकसान 

कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यात गेले अनेक दिवस पडणारा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबर्डे (ता. पन्हाळा) येथील संभाजी नानू पाटील यांच्या घरावर झाड व बांबूचे बेट पडले. त्यांच्या घरावरील पत्र्यासह भिंती ढासळल्यामुळे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाटील… Continue reading आंबर्डे येथे घरावर झाड पडून लाखाचे नुकसान 

error: Content is protected !!