गुजरातमध्ये भाजपला सत्तेबाहेर घालवण्यात काँग्रेस अपयशी

अहमदाबाद (विश्लेषण) : सत्तावीस वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही भाजप गुजरातमध्ये सत्तेत आली आहे. २७ वर्षे सत्तेत राहिलेल्या भाजपला सत्तेतून बाहेर घालवण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. गुजरातमध्ये भाजपने रेकोर्डब्रेक विजय मिळवला आहे. काँग्रेसला अत्यंत कमी म्हणजे फक्त १९ जागांवर विजय मिळाला आहे. शिवाय काँग्रेसची मतांची टक्केवारी निम्म्याहून अधिक झाली आहे. गुजरातच्या इतिहासातील काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव… Continue reading गुजरातमध्ये भाजपला सत्तेबाहेर घालवण्यात काँग्रेस अपयशी

गडहिंग्लज तालुक्यात चार ग्रामपंचायती बिनविरोध

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत रणधुमाळीत आज उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३४ पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यापूर्वीच बटकणंगले आणि कडलगेने बिनविरोधची घोषणा केली होती, तर आज कौलगे आणि कडालच्या उमेदवारांनी अतिरिक्त अर्ज मागे घेत बिनविरोधवर शिक्कामोर्तब केले. इतर ३० गावांमध्ये आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, काही गावांत तिरंगी तर काही गावांत एकास एक अशी… Continue reading गडहिंग्लज तालुक्यात चार ग्रामपंचायती बिनविरोध

आपटाळच्या सरपंचपदी संभाजी पाटील बिनविरोध

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील आपटाळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संभाजी सखाराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तुळशी-धामणी परिसरातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आपटाळ गावामध्ये युवकांचा पुढाकार आणि ज्येष्ठांनी दिलेली साथ यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध करून एक वेगळा पायंडा पाडला. सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये तितकेच अर्ज दाखल झाल्याने सदस्य निवड अगोदरच बिनविरोध झाली होती;… Continue reading आपटाळच्या सरपंचपदी संभाजी पाटील बिनविरोध

औरवाड ग्रामपंचायतीमध्ये ३ सदस्यांची बिनविरोध निवड

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील औरवाड येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या १३ जागांपैकी ३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता ग्रामपंचायतमध्ये १० जागांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये चार वाॅर्ड असून, वाॅर्ड क्रमांक ३ मधून प्रशांत चंद्रकांत मंगसुळे व विशाल विजय दुग्गे आणि मंगल राजाराम गावडे या ३ उमेदवारांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. औरवाड गावात तीन… Continue reading औरवाड ग्रामपंचायतीमध्ये ३ सदस्यांची बिनविरोध निवड

कळंबा सरपंचपदी सुमन गुरव यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कळंबा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुमन विश्वास गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुमन गुरव यांच्या निवडीने आ. सतेज पाटील यांचा गट कळंबा ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने सुद्धा खाते खोलले आहे. यापूर्वी शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी गावात भाजपचा सरपंच बिनविरोध झाला आहे. कळंब्यात थेट सरपंचपदासाठी मागासवर्गीय महिला… Continue reading कळंबा सरपंचपदी सुमन गुरव यांची बिनविरोध निवड

दिल्ली महापालिकेत भाजपचा १५ वर्षांचा गड खालसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभराचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत आम आदमी पक्षाने तब्बल १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पराभवाची चव चाखायला लावली आहे. सलग तीन विधानसभा निवडणूक आणि आता महापालिका निवडणुकीतही दिल्लीमध्ये ‘केजरीवाल’ यांच्याच नावाचा करिश्मा कायम असल्याचं… Continue reading दिल्ली महापालिकेत भाजपचा १५ वर्षांचा गड खालसा

एक्झिट पोल आणि विश्वासार्हता

विश्लेषण :  श्रीधर वि. कुलकर्णी लोकसभा किंवा विधानसभा मतदान पार पडले की मतदानोत्तर चाचण्यांचे रिपोर्ट प्रसिद्ध होऊ लागतात. त्यावर टीव्हीवर चोवीस तास चर्चा सुरु होतात; पण अनेकांच्या मनात हे रिपोर्ट खरंच विश्वसनीय असतात का असा प्रश्न आहे. काही लोकांच्या मते हा फक्त प्रचार आणि जाहिरातीचा भाग असतो तर काही जणांच्या मते यातून निकालाचा अंदाज करता… Continue reading एक्झिट पोल आणि विश्वासार्हता

गडहिंग्लज तालुक्यात सदस्यपदासाठी १४ अर्ज अवैध

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यात आज दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी  सरपंचपदाचे ३, तर सदस्यपदाचे १४ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील ३४ गावांत ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून, सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असून, त्यासाठी १८९ उमेदवारांनी १९१ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले असून, १८६ उमेदवार रिंगणात… Continue reading गडहिंग्लज तालुक्यात सदस्यपदासाठी १४ अर्ज अवैध

पन्हाळा तालुक्यात सरपंचपदासाठी ४ अर्ज अवैध

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात ५० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर सरपंचपदासाठी ४, तर सदस्यपदासाठी १८ अर्ज अवैध ठरले आहेत. पाटपन्हाळा, काखे, कोलोली येथील सरपंचपदासाठीचे ४ अर्ज अवैध ठरले. सदस्यपदासाठी परखंदळे,आकुर्डे, सावर्डे तर्फे आसंडोली, घरपण, यवलूज, कोतोली, कोलोली, पिंपळे तर्फ ठाणे, बांदिवडे, पोर्ले तर्फ बोरगाव, पाटपन्हाळा, किसरुळ येथील १८ अर्ज अवैध ठरले. छाननीसाठी… Continue reading पन्हाळा तालुक्यात सरपंचपदासाठी ४ अर्ज अवैध

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५९ टक्के मतदान

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरात निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले असून. जवळपास ५९ टक्के मतदानाची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. १८२ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी आज मतदान झाले. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.… Continue reading गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५९ टक्के मतदान

error: Content is protected !!