अतिवेग, चालकाच्या चुकीमुळे सायरस यांच्या कारला अपघात

मुंबई (प्रतिनिधी) : कारचा अतिवेग आणि चालकाच्या चुकीमुळे हा भीषण अपघात झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पंडोळे (वय ५५ ) या कार चालवत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात अनाहिता आणि त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईपासून १२० किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानंतर… Continue reading अतिवेग, चालकाच्या चुकीमुळे सायरस यांच्या कारला अपघात

चक्कर येऊन ओढ्यात पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : काळ कधी कसा येतो याचा नेम नाही म्हणतात… याचीच प्रचिती आजरा तालुक्यातील अर्दाळ येथे आली. ओढ्यात उभारून म्हशीला धुताना चक्कर आली आणि घात झाला. तानाजी विठोबा बाबर (वय ५५) या शेतकऱ्याच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तानाजी हे सकाळी दहाच्या सुमारास त्यांची एक म्हैस आणि रेडीला सोबत घेऊन देवविहिरीजवळच्या ओढ्यात… Continue reading चक्कर येऊन ओढ्यात पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गंगा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू

गाझीपूर (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये गंगा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला आहे. इंजिनवर चालणाऱ्या या बोटीमध्ये सुमारे २५-३० लोक बसले होते. बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे २२ जणांचे प्राण वाचवले, मात्र यातील पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. त्याचवेळी नाविकाने उडी… Continue reading उत्तर प्रदेशातील गंगा नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू

बोरिवली पश्चिममध्ये चार मजली इमारत कोसळली

मुंबई : बोरिवली पश्चिम भागामध्ये शुक्रवारी दुपारी चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती; मात्र यात कोणीही अडकले नसल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. येथे मदतकार्य देखील सुरु करण्यात आले आहे. मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला असताना बोरिवली पश्चिमेला असलेल्या साईबाबा… Continue reading बोरिवली पश्चिममध्ये चार मजली इमारत कोसळली

हरिहरेश्वरमधील बोटीत आढळल्या ३ एके-४७ रायफल्स

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथे संशयास्पद आज सकाळी बोट आढळली असून, या बोटीत तीन एके-४७ रायफल्स आणि काही कागदपत्रेही आढळून आली आहेत. दरम्यान, या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली आहे. ‘ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाची असून, बोटीचे इंजिन बिघडल्याने ती रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर तरंगत आली’, असे ते म्हणाले. आज… Continue reading हरिहरेश्वरमधील बोटीत आढळल्या ३ एके-४७ रायफल्स

काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून ७ जवान ठार

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या चंदनबाडीमध्ये आयटीबीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अनेक जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. प्राथमिक माहितीत या दुर्घटनेत ७ जवान ठार झाले… Continue reading काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून ७ जवान ठार

गंभीर जखमी वीज कर्मचाऱ्यासाठी मदतीचे आवाहन

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील मंदूर पैकी धुमाळवाडी येथील रवी विलास मार्गे (वय २४) या गंभीर जखमी वीज कर्मचाऱ्यावर कोल्हापुरातील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्याला समाजातून मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्ती, सामाजिक व विविध संस्थांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणच्या गगनबावडा उपविभागतील तिसंगी पैकी टेकवाडी येथे विद्युत लाईनवर… Continue reading गंभीर जखमी वीज कर्मचाऱ्यासाठी मदतीचे आवाहन

उत्तर प्रदेशमध्ये यमुना नदीत बोट बुडाली, चौघांचे मृतदेह सापडले

बांदा : रक्षाबंधनाच्या सणादिवशी उत्तर प्रदेशातील बांदा येथे गुरुवारी दुपारी मार्का पोलिस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी बोट बुडाली. या बोटीत ३० हून अधिक लोक होते. आठ जण कसेतरी पोहत बाहेर आले. बोट आणि बाकीचे लोक सापडले नाहीत. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. बोट उलटून सुमारे २० जणांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत… Continue reading उत्तर प्रदेशमध्ये यमुना नदीत बोट बुडाली, चौघांचे मृतदेह सापडले

कारच्या धडकेत महापालिकेचे चार कर्मचारी जखमी, एक गंभीर

कोल्हापूर (प्रतीनिशी) : संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ रिंग रोडवर आज (शनिवार) सकाळी आयसोलेशन हॉस्पिटलसमोर भरधाव आलिशान कारने महापालिकेच्या आरोग्य विभागातील चार कर्मचाऱ्याना ठोकरले. यामध्ये तीन महिलांचा समावेश असून, सर्व जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. विनायक लहू कांबळे (वय ४०, सुभाषनगर), वंदना संजय भालकर (वय ४५, वारे वसाहत), राजक्का विलास घेवदे (वय ५२, भारतनगर),… Continue reading कारच्या धडकेत महापालिकेचे चार कर्मचारी जखमी, एक गंभीर

तरस सदृश प्राण्याच्या हल्ल्यात कुत्रा, मांजर ठार

कळे (प्रतिनिधी) : तांदूळवाडी येथील बळवंत रामजी पाटील यांच्या गावडमळा नावाच्या शेतातील घराची राखण करणाऱ्या कुत्रा व मांजरास तरस सदृश प्राण्याने हल्ला करून ठार केले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटील यांच्या शेतामध्ये जनावरांचा गोठा आहे. रात्री तरस सदृश प्राण्याने बांधलेला कुत्रा व बाजूच्या मांजर यांच्यावर हल्ला करुन शीर फस्त केले होते. याची… Continue reading तरस सदृश प्राण्याच्या हल्ल्यात कुत्रा, मांजर ठार

error: Content is protected !!