एसटी महामंडळाचे खासगीकरण ? ; अनिल परब म्हणतात…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील एसटी कामगारांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढू लागली आहे. यावर आता मार्ग काढण्यासाठी सरकारने विविध पर्यायावर विचार सुरू केला आहे. त्यातच एसटी महामंडळाचे खासगीकरण कऱणे, हा एक मुद्दा समोर आला आहे. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाष्य… Continue reading एसटी महामंडळाचे खासगीकरण ? ; अनिल परब म्हणतात…

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा : सतीश देशपांडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : त्रिपुरातील घटनेचे कारण देऊन महाराष्ट्रात अमरावती, मालेगाव, नांदेड आणि अन्य भागांत विनापरवानगी मोर्चे काढून हिंदूंवर हल्ले करण्यात आले. रझा अकादमीचा इतिहास पहाता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षड्यंत्र ?’ या विषयावर… Continue reading दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा : सतीश देशपांडे

मुंबईत हुंडाईच्या सर्व्हिस सेंटर आग : कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक

मुंबई (प्रतिनिधी) : पवईच्या साकी विहार रस्त्यावरील लार्सन एंड टूब्रो कंपनीच्या समोर असलेल्या साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या. ही घटना आज (गुरूवार) घडली. ही आग इतकी भीषण आहे की, शोरूममधून मोठे, मोठे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे ५ बंब दाखल झाले… Continue reading मुंबईत हुंडाईच्या सर्व्हिस सेंटर आग : कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) :  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय १००) यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. मागील ३ दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची  प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे.  त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्याजवळच्या सासवडमध्ये झाला. भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.  २०१५… Continue reading शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

१९४७ मध्ये कोणतं युद्ध झालं ?, मला सांगा, मी माफी मागेन : कंगना राणावत

मुंबई (प्रतिनिधी) : एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळालं, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. यावर कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत आपला खुलासा केला आहे.    यात तिने म्हटले आहे की, १८५७ साली स्वातंत्र्यासाठी पहिली एकत्र लढाई लढली गेली. सोबतच सुभाषचंद्र… Continue reading १९४७ मध्ये कोणतं युद्ध झालं ?, मला सांगा, मी माफी मागेन : कंगना राणावत

राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल : मुख्यमंत्री  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून सक्रीय रूग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीत कोरोना निर्बंधामध्ये  शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) वर्षा निवासस्थानी टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत चर्चा केली.   यावेळी राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे… Continue reading राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल : मुख्यमंत्री  

समीर वानखेडेंच्या पाळत ठेवल्याच्या आरोपावर गृहमंत्र्यांचा ‘मोठा’ खुलासा

मुंबई (प्रतिनिधी) : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांनी याबाबतची  तक्रार पोलीस महासंचालकांकडे केली आहे. आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा केला आहे. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.   वळसे- पाटील म्हणाले की, मला वाटत नाही, की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे.… Continue reading समीर वानखेडेंच्या पाळत ठेवल्याच्या आरोपावर गृहमंत्र्यांचा ‘मोठा’ खुलासा

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारकडून ‘मोठा’ निधी मंजूर  

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने  जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे बाधित  झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत तत्काळ बाधीतांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित विभागानी  दक्षता घावी, अशा सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जुलैमध्ये… Continue reading पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारकडून ‘मोठा’ निधी मंजूर  

लखीमपूर हिंसाचार : ११ ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या  निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केली. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हा बंद पुकारला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील… Continue reading लखीमपूर हिंसाचार : ११ ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक

टीईटी, आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी : आरोग्यमंत्र्यांनी काढला मार्ग    

मुंबई  (प्रतिनिधी) :  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २४ ऑक्टोबरला ‘गट क’ आणि ३१ ऑक्टोबरला ‘गट ड’ ची परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी  टीईटी परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाचदिवशी आल्याने दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त… Continue reading टीईटी, आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी : आरोग्यमंत्र्यांनी काढला मार्ग    

error: Content is protected !!