कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथे अंगणात वाळत घातलेली कपडे मोटरसायकलवर पडल्याच्या कारणावरून मुस्कान रफिक जमादार (रा. डिग्रज ता.मिरज) या विवाहितेला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याची फिर्याद रेश्मा नजीर निशाणदार (रा. बुबनाळ) यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे.

दरम्यान जखमी मुस्कान जमादार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे. या प्रकरणी गोगा बैरागदार, नियाज बैरागदार, रोशन बैरागदार, तनुजा बैरागदार (सर्व रा.बुबनाळ, ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर वैद्यकीय अहवालानुसार योग्य तो तपास करून गुन्हा दाखल करणार असल्याचे कुरुंदवाडचे सपोनी. बालाजी भांगे यांनी सांगितले.