कळे प्रतिनिधी : पोलिस वारंवार जुगाराच्या केसेस टाकत असतात म्हणून पोलिस ठाण्याच्या आवारात आत्महत्या करणारा सचिन विनायक खवळे (रा. काऊरवाडी ता. पन्हाळा ) यास कळे पोलिसांनी ताब्यात घेतले असून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, सचिन खवळे मटका घेत असतो दरवेळी तो पोलिसांनी मटका घेताना सापडत असल्याने त्याच्यावर अनेक वेळा जुगाराच्या केसेस होतात. शुक्रवार दि.२१ रोजी. दुपारी पावणे एकच्या सुमारास सचिन खवळे पोलिस स्टेशनमध्ये आला असता त्याने ओरडून यापुढे माझ्यावर केसेस टाकल्यास मी आत्मदहन करेन असे म्हणून त्याने खिशातून पेट्रोल सदृश्य असलेली बाटली काढली. यावेळी पोलिस कॉ.सुनिल खाडे, आशिष शेलार यानी त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक महादेव खाडे करत आहेत.
Post Views: 45