नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर छापे टाकत 44 लोकांना अटक केली, मानवी तस्करी नेटवर्कच्या एका मोठ्या मॉड्यूलला धडक दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश, पुद्दुचेरी येथे छापे टाकले आहेत.

आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) 9 सप्टेंबर 2023 रोजी नोंदवलेला प्रारंभिक गुन्हा भारत-बांग्लादेश सीमेपलीकडील अवैध स्थलांतरितांच्या घुसखोरीसाठी आणि पुनर्वसनासाठी जबाबदार असलेल्या मानवी तस्करी नेटवर्कशी संबंधित होता. ज्यामध्ये रोहिंग्या वंशाच्या लोकांचाही समावेश आहे.

व्यापक नेटवर्कच्या मॉड्यूल्सचा पर्दाफाश

या अवैध मानवी तस्करी नेटवर्कचे विविध मॉड्यूल तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसह विविध राज्यांतून पसरलेले आणि कार्यरत असल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे. या तपासाच्या निष्कर्षांच्या आधारे, NIA ने देशातील विविध प्रदेश आणि राज्यांमध्ये असलेल्या या व्यापक नेटवर्कच्या मॉड्यूल्सचा पर्दाफाश करण्यासाठी तीन नवीन प्रकरणे नोंदवली.