इचलकरंजी (प्रतिनिधी) : विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार माजी आ. अमल महाडिक यांना प्रचंड मताने निवडून आणूया, असा निर्धार व्यक्त करून आ.  प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी महाडिक यांना जाहीर पाठिंबा दिला. कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाडे गटाची बैठक ताराराणी पक्ष कार्यालयात आज (शुक्रवार) झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आ. महादेवराव महाडिक, प्रा. जयंत पाटील, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जनता बँक संचालक स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक- निंबाळकर, माणगावचे सरपंच राजू मगदूम, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, प्रकाश सातपुते, प्रकाश मोरे, प्रा. चंद्रशेखर शहा, रुबेन तात्या आवळे, रोहन आवळे, सर्जेराव पाटील, एम. के. कांबळे यांच्यासह ताराराणी पक्षाचे सर्व नगरसेवक व आवाडे समर्थक उपस्थित होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील, महादेवराव महाडिक, अमल महाडिक यांनी भाजपच्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या मतदारांनी पक्षाची एकजूट दाखवत भाजपचा उमेदवार विधान परिषदेत पाठवण्यासाठी वज्रमूठ बांधण्याचा विश्वास दिला.