लखीमपूर हिंसाचार : ११ ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या  निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केली. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हा बंद पुकारला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील… Continue reading लखीमपूर हिंसाचार : ११ ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक

अधिकाऱ्यांना फक्त माहिती दिली : मनिष भानुषालींचे मलिकांच्या आरोपांना उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : मला ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे दोषींना शिक्षा झाली पाहीजे. तसेच युवकांना नशेच्या जाळ्याच ढकलणाऱ्यांना रोखण्यासाठी मी एनसीबी अधिकाऱ्यांना माहिती दिली. यावर कारवाई करण्याचे मला अधिकाऱ्यांनी सांगितले. या पलिकडे या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असा खुलासा मनिष भानुषाली यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मनिष भानुशाली… Continue reading अधिकाऱ्यांना फक्त माहिती दिली : मनिष भानुषालींचे मलिकांच्या आरोपांना उत्तर

राज्यातील जि.प. च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला..!

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ६ जिल्हा परिषदांच्या ८५ जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकीची मतमोजणी आज (बुधवार) पार पडली. भाजपने जि. प. वर पुन्हा एकदा वर्चस्व ठेवण्यात यश मिळवले आहे. भाजपने सर्वाधिक २३ जागा जिंकल्या  आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. तर  शिवसेनेची कामगिरी खालावली असून १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकंदरीत या… Continue reading राज्यातील जि.प. च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचाच बोलबाला..!

राज्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ६ जिल्हा परिषद पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (बुधवार) पार पडली. पंचायत समितीच्या १४४ जागांचे कल समोर आले असून सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तर पाठोपाठ अपक्षांनीही चांगल्या जागा मिळवल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार असून शिवसेना चौथ्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पाचव्या क्रमांकावर फेकली आहे.  पंचायत समिती पोटनिवडणूक (१४४ जागा) काँग्रेस… Continue reading राज्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसची मुसंडी

वारणा कापशी येथील आरवच्या खूनाचे गूढ कायम

शाहूवाडी (प्रतिनिधी) : वारणा कापशी (ता.शाहूवाडी) येथील निष्पाप आरव केसरे या बालकाच्या खूनाचे गूढ कायम आहे. अद्याप पोलिसांना धागेदारे मिळालेले नसून सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे. तर दुसऱ्या दिवशीही गावासह तालुक्यात तणावपूर्ण वातावरण होते. तर कापशी येथे पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आल्याने शांतता पसरली आहे.  पोलिसांनी तपासाबाबत सूक्ष्मरित्या यंत्रणा गतिमान केली आहे. आरवच्या… Continue reading वारणा कापशी येथील आरवच्या खूनाचे गूढ कायम

गिर्यारोहक कस्तुरी सावेकरचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगातील १४ अष्टहजारी शिखरांपैकी एक अती अवघड असणारे माउंट मनस्लू हे कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर या रणरागिणीने सर करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. छत्रपती ताराराणी पुतळा येथे आज (बुधवार) तिचे तुतारीचा निनाद आणि टाळ्यांचा कडकडाट… अशा भारावलेल्या वातावरणात जल्लोषी स्वागत करण्यात आले. कोल्हापुरातील गिर्यारोहण संस्थेचे पदाधिकारी व करवीर नगरीतील नागरिक यावेळी… Continue reading गिर्यारोहक कस्तुरी सावेकरचे कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

गांधीनगर ग्रा.पं. च्या कारभाराच्या निषेधार्थ दलित महासंघाची मुखवटे घालून निदर्शने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर हद्दीतील सिंधी सेंट्रल पंचायत इमारतीचा संपूर्ण थकीत घरफाळा वसूल करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज (बुधवार) दलित महासंघाच्या वतीने करवीर पंचायत समितीसमोर गांधीनगर ग्रामपंचायतीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तोंडावर धिक्काराचे मुखवटे घालून घोषणाबाजी केली. गांधीनगर हद्दीत सिंधी सेंट्रल पंचायत इमारत असून या इमारतीचा ग्रामपंचायत प्रशासनाने… Continue reading गांधीनगर ग्रा.पं. च्या कारभाराच्या निषेधार्थ दलित महासंघाची मुखवटे घालून निदर्शने

एनसीबीच्या कार्यालयात अरबाज मर्चंटला नेणारा भाजपचा उपाध्यक्ष : नवाब मलिकांचा आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयामध्ये नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत एनसीबीचा अधिकारी नव्हता. तर भाजपचा उपाध्यक्ष होता.  याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (बुधवार) पत्रकार… Continue reading एनसीबीच्या कार्यालयात अरबाज मर्चंटला नेणारा भाजपचा उपाध्यक्ष : नवाब मलिकांचा आरोप

शिवसेना खासदार पुत्राचा जि.प. निवडणुकीत पराभव

पालघर (प्रतिनिधी) : पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव करत भाजपचे पंकज कोरे यांनी जिल्हा परिषद निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे खा. गावीत यांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे. पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटामधून राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजेंद्र गावित… Continue reading शिवसेना खासदार पुत्राचा जि.प. निवडणुकीत पराभव

कागलच्या कुरुक्षेत्रात आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कागलच्या कुरुक्षेत्रात आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील. आजचे तरुण स्वावलंबी झाले पाहिजेत. नोकऱ्या मागणाऱ्या तरुणापेक्षा नोकऱ्या देणारे देणारे तरुण निर्माण झाले पाहिजेत, यासाठी मला सर्वांची साथ हवी आहे, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष  समरजितसिंह घाटगे यांनी केले. राजे बँकेच्या कर्जदार ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले… Continue reading कागलच्या कुरुक्षेत्रात आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील : समरजितसिंह घाटगे

error: Content is protected !!