येलूर (प्रतिनिधी) : बहादूरवाडी (ता. वाळवा) येथील आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट पद्धतीने सेवा बजाविणाऱ्या १० आशा स्वयंसेविकांचा प्राथमिक आरोग्य केंद्र, येलूर संचालित बहादूरवाडी उपकेंद्रात सन्मान करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष हंबीरराव माने, उपाध्यक्ष गणपती धूमके यांच्या हस्ते त्यांना सॅनिटायझर, मास्क, सनकोट, गहू, तांदूळ, साखर व कडधान्ये देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सचिव राजेंद्र घोरपडे, संचालक, सर्व आजी-माजी सैनिक सपत्नीक उपस्थित होते.