वारणानगर ( प्रतिनिधी ) : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयास यावर्षी टीसीएस स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम या शाखेस 60 जागांची मान्यता मिळाली. तसेच एआयसीटीई ने नव्याने सुरू केलेल्या ऑफ कॅम्पस कार्यक्रमांतर्गत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवे पारगाव या ऑफ कॅम्पसमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60 जागा, कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग 120 जागा, टीसीएस स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम 120 जागा, आणि सायबर सिक्युरिटी या शाखेस 60 जागा अशा सर्व शाखेस एआयसीटीई इकडून शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून मान्यता मिळाल्याचे माहिती वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिली.

सायबर सिक्युरिटी ही नवीन इमर्जिंग शाखा असून महाराष्ट्रात आणि पर्यायी भारतात हा कोर्स खूपच कमी महाविद्यालयात उपलब्ध आहे. सध्याचे राज्य आणि केंद्र शासनाचे सायबर सिक्युरिटी बाबतचे धोरण पाहता या क्षेत्रातील अभियंतांना भविष्यात भरपूर संधी उपलब्ध असणार आहेत. असा हा खूप मागणी असलेला सायबर सिक्युरिटी कोर्सला तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीस एआयसीटीई इकडून मान्यता मिळाली आहे.

तसेच यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयास एआयसीटीई कडून बीबीए व बीसीए या अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून मान्यता मिळाली व कोरे अभियांत्रिकीस शिवाजी विद्यापीठाकडून पदवीत्तर एमबीए आणि एमसीए या अभ्यासक्रमासही मान्यता मिळाल्याचे श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी सांगितले. तसेच भविष्यात बीसीएस सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीस एकूण 300 वाढीव जागा व कोरे अभियांत्रिकीच्या ऑफ कॅम्पस, नवे पारगाव येथे 360 वाढीव जागांची मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

डीन, डॉ. एस. एम. पिसे म्हणाले की, कोरे अभियांत्रिकी गेल्या ४१ वर्षापासून इंजिनिअरिंग क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करत आहे शैक्षणिक गुणवत्ता, इंडस्ट्री रेडी अभ्यासक्रम, सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर ट्रेनिंग, अद्ययावत प्रयोगशाळा, प्लेसमेंटची हमी, संशोधक प्रकल्प क्रीडांगण सुसज्ज इमारत आणि ग्रंथालय या क्षेत्रावर अग्रेसर असल्याचे नमूद केले. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या www.tkietwarana.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

यावेळी प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, ॲडमिशन इन्चार्ज, डॉ. अमोल पाटील, प्रा. गणेश कांबळे, डॉ. सौरभ बोरचाटे, जालिंदर जाधव, सर्व विभागप्रमुख, डीन उपस्थित होते.