मुंबई : ‘पुष्पा’ चित्रपटाने संपूर्ण भारताला वेड लावलेल. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पुष्पा’ने विक्रमी कमाई केली. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागाचे नाव ‘पुष्पा द राईज’ होते, तर दुसऱ्या भागाचे नाव ‘पुष्पा द रुल’ असणार आहे. नुकतेच यासाठी एका पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’ साठी १२५ कोटी मानधन घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय सुकुमार ५० कोटी घेत आहे आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यासाठी ५ कोटी घेत आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यात जगभरातील पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुष्पा २ चे शूटिंग सुरू करण्यची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

‘पुष्पा द राइज’ २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला. सगळीकडे पुष्पाचीच क्रेझ पहायला मिळत होती. त्यामुळे पुष्पाच्या पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद पाहता दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या सतत चर्चेत असतो. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या अफाट यशानंतर अल्लू अर्जुनची बॉलिवूडमधील लोकप्रियता गगनाला भिडली आहे.