पुणे – सध्या लोकसभेचं पडघम वाजत आहे . काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आपले एक वक्तव्य गळाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेली भाषण चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहेत. अशातच काल इंदापूर येथे एका मेळाव्यादरम्यान अजित पवार यांनी तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘त्या’ वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार..?

महायुतीकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी बारामती शिरूर आणि पुणे मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यापूर्वी आज सकाळी अजित पवार यांनी सपत्नीक दगडूशेठ गणपतीची आरती केली आणि बाप्पाला साकड घातलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले तुम्ही ध् चा मा करू नका, मी हे हसत हसत गमतीने बोलत होतो, . त्यानंतर ग्रामीण भाषेत कचाकचा हा शब्द वापरला जातो. त्यामुळे मी ते बोललो. यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. या कार्यक्रमात सगळे प्रतिष्ठित डॉक्टर्स होते, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे.

अजित पवार आज सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या फक्त सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. बाकी उमेदवारांचे अर्ज नंतर दाखल करण्यात येणार आहे,असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.