कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेच्या  प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी  आपल्या वाढदिवसानिमित्त महावीर उद्यान येथे वृक्षारोपण केले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेतील तसेच ज्यांना कोरोनाची लागण होऊन जे बरे झालेले आहेत. अशा सर्व कर्मचारी व नागरिकांनी पर्यावरणासाठी किमान एका वृक्षाचे रोपण करुन त्याचे संगोपन करावे. आपल्या भोवतालचा परिसरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन वायूची निर्मिती कशी वाढेल, त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.

यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे,  माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार,  सहायक उद्यान अधीक्षक राम चव्हाण आदीसह कर्मचारी उपस्थित होते.