शेवगाव ( प्रतिनिधी ) : शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली तब्बल तेरा कोटी 1 कोटी 16 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार शेवगाव घडला, ए डी कंपनीतील गुंतवणुकीतून दर महिण्याला दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. ठकबाजांनी पैसे परत करण्यास नकार देत गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ नामदेव भागवत (वय 44, रा. एरंडगाव भागवत ता.शेवगाव जि.अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी नामे- AD नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग कंपनी पतसंस्था पतपेढी या नावाने अंबीका कॉलोनी पाथर्डी रोड शेवगाव, जि. अहिल्यानगर येथे कंपनीच्या नावाखाली अंदाजे एकुण- 1,16,00,000/- रुपयांची फिर्यादी आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी अनिरुध्द मुकुंद धस रा. एरंडगाव भागवत ता. शेवगाव जि.अहिल्यानगर हा शेवगाव शहरामध्ये आल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दोन पोलीस पथक तयार करुन शेवगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले होते. नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी अनिरुध्द मुकुंद धस हा त्याचे राहते घरी जाताच नमुद गुन्ह्यातील आरोपीत यास पोलीसांची चाहुल लागताच पळुन जात असतांना पोलीस पथकाने त्याचा शिताफिने पाठलाग करुन मिरी रोड सासरवाडी हाँटेलच्या समोर पकडुन ताब्यात घेवुन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला अहिल्यानगर, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, सपोनि अशोक काटे, पोहेकाँ किशोर काळे, पोहेकॉ चंद्रकांत कुसारे, पोना संदिप आव्हाड, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ प्रशांत आंधळे, पोकाँ संपत खेडकर, पोकाँ मारुती पाखरे, पोकाँ कृष्णा मोरे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास सपोनि अशोक काटे हे करत आहेत.