कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे या यमगेच्या सुपुत्राने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेल्या उज्वल यशानंतर त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. कौतुकात मग्न असतानाच भावी पिढ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांच दालन उपलब्ध करून देण्याची जिद्द बाळगून बिरदेव डोणे यांनी ‘बुके नकोच बुक द्या. ‘असे आवाहन करत आहेत. त्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांच्यावर ग्रंथदानाचा वर्षाव होत आहे . अशालच पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी थेट बिरदेव डोणे यांचे घर गाठत त्यांना श्रीमान योगी कादंबरी ग्रंथदान उपक्रमासाठी सुपूर्द केली.

यावेळी झालेल्या चर्चेवेळी माझ्याकडे पुस्तके आहेत पण आम्हाला ग्रंथालयाची मान्यता मिळवून द्या ? असा शब्द डोणे यांनी ॲड. मंडलिक यांच्यासमोर टाकला. ॲड. मंडलिक यांनी तात्काळ त्याची दखल घेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधला. पालकमंत्र्यांशी बोलताना बिरदेव ढोणे यांनी गावात ग्रंथालयाला शासनाची मान्यता मिळवून द्या आणि तीही लवकर द्या अशी आग्रही मागणी केली. यावर पालकमंत्री अबिटकर यांनी दोन्ही यांच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करत सरकार तुमच्या पाठीशी आहे तातडीने तुमची मागणी पूर्ण केली जाईल असा शब्द दिला.

तुम्ही उभारत असलेल्या वाचनालयासाठी मुरगुडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयाकडून लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता आम्ही करून देऊ असा शब्द एडवोकेट वीरेंद्र मंडलिक यांनी डोळे यांना दिला शिवाय या कामी तातडीने निधी उपलब्ध करून शासन मान्यता व इमारतीचे काम करून देऊ असा शब्दही दिला.

वीरेंद्र मंडलिक यांच्या या तातडीच्या पाठपुराव्यामुळे बिरदेव ढोणे यांच्या स्वप्नातील वाचनालय तातडीने उभे राहील आणि त्याचा अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लाभ होईल हे निश्चित या निमित्ताने वीरेंद्र मंडलिक यांनी आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवून दिली.