कळे (प्रतिनिधी) : येथील पन्हाळा एज्युकेशन सोसायटी संचलित  कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी पर्यवेक्षक ए. बी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

प्रशालेचे मुख्याध्यापक  एस. जी. गुरव यांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने त्यांच्या रिक्तपदी गायकवाड यांची संस्थेकडून नियुक्ती करण्यात आली आहे.  गायकवाड यांची ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संस्थेकडून सेवा ज्येष्ठतेनुसार  मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र देऊन गायकवाड यांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला. संस्था सचिव पी. ए. यज्ञोपवित, संचालक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. के. कुलकर्णी, संस्थेच्या प्राथमिक विभागाचे कार्यकारी संचालक अक्षय लाड, प्रा. कृष्णात खोत, प्रा. बी. बी. कांबळे यांच्यासह प्रशालेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.