ब्राझील (वृत्तसंस्था) : ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात एक भयानक अपघात घडला आहे. तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कॅटरिना येथे 21 प्रवाशांना घेऊन जाणारा एक गरम हवेचा फुगा अर्थात हॉट एअर बलून कोसळला. ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारस घडली. सकाळी उड्डाण केल्यानंतर पर्यटकांच्या या हॉट एअर बलूनला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे तो बलून फुटला आणि हा बलून प्रेया ग्रांडे शहरात कोसळला. या घटनेत 21 प्रवाशांपैकी 8 जणांचा मृत्यू झालाय. तर जखमींना आसपासच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.