कोल्हापूर (प्रतिनधी) :शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आम आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. महालक्ष्मी ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना उबाठा चे उपनेते संजय पवार, शिवसेना समन्वयक सत्यजित कदम, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी शिबिरास भेट दिली.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. रक्तदान शिबिराचे हे पाचवे वर्ष असल्याचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, आदम शेख, प्रथमेश सूर्यवंशी, अभिजित कांबळे, दत्तात्रय बोनगाळे, राजेश खांडके, सफवान काझी, राकेश गायकवाड, लाला बिरजे, संजय नलवडे, चेतन चौगुले, सचिन पाटील आदी उपस्थित होते.