सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका तरुणाला नग्न करून त्याचा खून करण्यात आला आहे. बिडवाडकर असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील शिवसेनेचा तो आका कोण..? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणीही वैभव नाईक यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती बीडपेक्षा गंभीर असल्याचा आरोप नाईक यांनी केलाय.कुडाळमधील बिडवाडकर हा तरुण 22 हजार रुपये देऊ शकला नाही म्हणून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप नाईकांनी केला. त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ त्यांनी फेसबुक पेजवरून शेअर केला.खून करणारा आरोपी शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्याला स्थानिक आमदार वाचवायचा प्रयत्न करत आहेत. तसंच पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही वैभव नाईक यांनी केलाय. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपीसह त्याचे 3 साथीदार सध्या न्यायालयीन कोठाडीत आहेत.