दिल्ली : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर राणाला आज भारतात आणले. NIA आणि गुप्तचर संस्था रॉ यांचे संयुक्त पथक बुधवारी एका विशेष विमानाने तहव्वूरसोबत रवाना झाले. त्याला कडक सुरक्षेत अमेरिकेतून भारतात आणले गेले.

तहव्वुर राणाला बुलेटप्रूफ कारमधून एनआयए मुख्यालयात नेले जाणार असल्याने एनआयए मुख्यालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. राणाच्या चौकशीची जबाबदारी एका मराठी आयपीएस अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. NIA मुख्यालयात तहव्वूर राणांची अनेक मोठे अधिकारी चौकशी करु शकतात. त्याच्याकडून फक्त २६/११ च नाही तर अनेक दहशतवादासंदर्भात माहिती मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले होते. राणावर 12 गुन्ह्यांचा आरोप होता, ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांच्या हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे यांचा समावेश होता.