कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये नामनिर्देशन दिनांकापासून प्रचार कालावधी संपेपर्यंत दि. 22 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान मतदान दिवस आणि निवडणूक निकालादिवशी झालेला खर्च उमेदवार खर्च नोंदवहीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधींसाठी दि. 16 डिसेंबरला सकाळी 11 वाजता प्रशिक्षण आणि खर्च ताळमेळ बैठक दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राजर्षी शाहू सभागृह,सर्किट हाऊस,कोल्हापूर येथे आयोजित केली आहे.

त्यानुसार उमेदवार,उमेदवार प्रतिनिधी यांनी उमेदवार खर्च नोंदवही, मुळ प्रमाणके, बँक पासबुक-स्टेटमेंट छायांकित प्रत, भाग 1 ते भाग 4 प्रपत्रे जोडपत्र ई-2 अनुसुची 1 ते 11, प्रतिज्ञापत्र आणि उमेदवारांना देण्यात आलेल्या नोटीस आणि त्यांची उत्तरे यासह प्रशिक्षण आणि बैठकीस उपस्थित रहावे,असे आवाहन 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांनी केले आहे.

निवडणूक खर्च संनियंत्रण अनुदेशांचा सारसंग्रह ऑगस्ट 2024 मधील भाग आणि पृष्ठ क्र. 23 अ नुसार खर्च निरीक्षक निकालाच्या दिवसापासून 25 व्या दिवशी मतदार संघात येतात व 26 व्या दिवशी अंतिम ताळमेळ बैठक घेतात.तसेच उमेदवारांच्या खर्चाच्या लेख्यांची छाननी करतात. या कालावधीतील उमेदवारांच्या खर्चाचे अंतिमीकरण करण्यात येऊन सर्व खर्च प्रपत्रे निकालाच्या दिवसापासून 30 दिवसात जमा करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांना आवश्यक माहिती देण्यासाठी लेखे जमा करण्यापूर्वी किमान एक आठवडा आधी प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक आहे,अशी माहिती धार्मिक यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.