मुंबई ( प्रतिनिधी ) : गेल्या महिन्याभरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ धुरळा पडला आहे. आज अखेर मतदानाचा दिवस उजाडला आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांनी वरळ पहायला मिळत आहे. मराठी कलाकरांनीही आपला मतदानाचा हक्क बजवला आहे.
अभिनेता अविनाश नारकरने मतदानाचा हक्क बजवला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी बोटाला शाई टेन्शन नाई असं गाणं टाकत सोशल मीडियावर मुलभूत अधिकार बजावला.

प्राजक्ता माळी हिनंही तिच्या सोशल मीडियावर मतदान झाल्याचं सांगितलंय. अमृताने आई सोबत बजावला मतदानाचा अधिकार.

सोनाली कुलकर्णीनेही छान कॅप्शन लिहतं मतदान केल्याचं कळवलं.

अभिनेत्री सायली संजीव, स्पृहा जोशी आणि जुई गडकरी यांनीही मतदान केले.

अभिनेता सुबोध भावे आणि रितेश देशमुख यांनीही आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णीनेही तिच्या पतीसोबत मतदान केल्याचा फोटो काढत मतदानाचा हक्क बजावला आहे. शशांक केतकरनेही हक्क बजावला.
