गगनबावडा (प्रतिनिधी ) : गगनबावडा तालुक्यातील असळज येथे लोकशाही अधिक बळकट व्हावी या उद्देशाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे करवीर विधानसभा मतदारसंघांतील 275 / 71 ह्या मतदान केंद्रावर ‘आदर्श मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जावे म्हणून असळज ग्रामपंचायत अधिकारी यांनी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी पर्यटण स्थळे आणि सेल्फी पॉईंट ही थीम निवडून मतदान केंद्रावर आकर्षक मंडपाची उभारणी केली आहे.
या मतदान केंद्राबाहेर मंडप उभारण्यात आला होता. त्याच्या दोन्ही बाजूला सुरुवातीला नारळाची झाडे लावून पर्यटन विषयी माहिती देण्यात आली. यामध्ये डिजिटल फ्लेक्स लावून स्वागत कमान उभारून मतदारांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला आहे. यावेळी मतदारांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.