कोल्हापुरात बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबा सय्यद यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान (व्हिडिओ)

कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बैतुलमाल कमिटीचे जाफरबाबांना विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. शिवांजनी फौंडेशन, संयुक्त आझाद गल्ली, हुजूर गल्ली, आराम कॉर्नर, राजाराम रोड, शिवाजी रोड यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

पुणे (प्रतिनिधी) : मंत्री धनंजय मुंडे, मेहबूब शेख यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने हा गंभीर आरोप केला. पुणे येथे आज (गुरुवार) भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पीडित महिलेसोबत पत्रकार परिषद घेतली. पोलिसांत तक्रार देऊनही राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप… Continue reading राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

राज्यात महाआवास अभियानांतर्गत ७ लाख घरकुलांची बांधकामे : ना. मुश्रीफ

मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देऊन गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या  कालावधीत राबविण्यात आला. त्यास चांगले यश मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत राज्यात ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले.  त्यापैकी ३ लाख ६२१ घरकुले बांधून पूर्ण… Continue reading राज्यात महाआवास अभियानांतर्गत ७ लाख घरकुलांची बांधकामे : ना. मुश्रीफ

गांधीनगर येथील कचऱ्याचे बायो मायनिंगव्दारे व्यवस्थापन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर (ता.करवीर)  येथील डपिंग ग्राऊंडवरील जमा झालेल्या सुमारे ६  हजार  टन कचऱ्याचे बायो मायनिंगव्दारे व्यवस्थापन केले जाणार आहे. या कामाचा शुभारंभ आ. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत  आज (गुरूवार) करण्यात आला.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. उद्योजकांची सामाजिक जबाबदारी (सीएसआर फंड) अंतर्गत रिकार्ट इंडिया  दिल्ली  आणि हिंद ॲग्रो… Continue reading गांधीनगर येथील कचऱ्याचे बायो मायनिंगव्दारे व्यवस्थापन

नाशिक महापालिकेसमोर ऑक्सिजन सिलिंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : अनेक रुग्णालये फिरुनही बेड मिळत नसल्याने दोन कोरोनाग्रस्त रुग्णांनी ऑक्सिजन सिलिंडरसह नाशिक महापालिकेसमोर बुधवारी  आंदोलन केले होते.  दरम्यान, दोन  कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकाचा रात्री मृत्यू झाला.  कोरोनाग्रस्तांनी केलेल्या आंदोलनामुळे महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती. महापालिका प्रशासनाने ऑक्सिजन सिलिंडरसह आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मध्यरात्री त्या रुग्णाची प्राणज्योत मालवली.… Continue reading नाशिक महापालिकेसमोर ऑक्सिजन सिलिंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

गडहिंग्लज ‘पंचायत समिती’ राज्यात सर्वोत्कृष्ट

गडहिंग्लज (प्रतिनिधी)  :  भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून देण्यात येणारा राज्यस्तरावरील ‘दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार’  गडहिंग्लज पंचायत समितीला प्राप्त झाला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून १ जिल्हा परिषद,  २ पंचायत समिती आणि १४ ग्रामपंचायती निवडण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत सातारा तर ग्रामपंचायतीमधून १४ गावामध्ये कागल तालुक्यातील तमनाकवाडा या गावाची निवड झाली आहे. ‘यशवंत पंचायत… Continue reading गडहिंग्लज ‘पंचायत समिती’ राज्यात सर्वोत्कृष्ट

पालकमंत्र्यांचे ‘गोकुळ’मध्ये सत्ता परिवर्तनाचे स्वप्न भंगणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) कारभार आमदार पी. एन. पाटील,  ज्येष्ठ संचालक  अरूण  नरके आणि  माजी आमदार  महादेवराव महाडिक यांनी शेतकरी हिताचा केला आहे. त्यामुळे  दूध उत्पादकांचा सत्ताधाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच गोकुळमध्ये सत्ता परिवर्तनाचे पालकमंत्र्यांचे  स्वप्न भंगणार आहे, असा टोला  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी लगावला .… Continue reading पालकमंत्र्यांचे ‘गोकुळ’मध्ये सत्ता परिवर्तनाचे स्वप्न भंगणार : शौमिका महाडिक

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप

पुणे  (प्रतिनिधी) : लैंगिक अत्याचारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली. तृप्ती देसाई यांनी पीडितेसह आज (गुरूवार) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.    पत्रकार परिषदेत पीडिता म्हणाली की,  विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडिओ काढले आहेत.  ते वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर… Continue reading राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई  (प्रतिनिधी) : दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी  आज (गुरुवारी)  पत्रकार परिषदेत केली. भारतीय चित्रपटसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार प्रतिष्ठित मानला जातो. प्रकाश जावडेकर म्हणाले की,  महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर… Continue reading रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

फालतू राजकारण करू नका : शिवसेनेने भाजपला सुनावले

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे. कोरोना कुणालाही सोडत नाही,  असे शिवसेनेने म्हटले आहे. मुंबई, पुणे,… Continue reading फालतू राजकारण करू नका : शिवसेनेने भाजपला सुनावले

error: Content is protected !!