कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेअंतर्गत कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत ७८ हजार ३२३ घरांचे आणि ३ लाख ४१ हजार १६९ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या तालुकानिहाय अशी : आजरा २८३१, भुदरगड २०३३, चंदगड ३८६०, गडहिंग्लज २०४८, गगनबावडा ८४५, हातकणंगले ८९८२, करवीर ९४११, कागल ४९३१, पन्हाळा ४५३४, राधानगरी ३६१५, शाहूवाडी ४०१३, शिरोळ ५२३४ जणांचे सर्व्हेक्षण केले आहे.