कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यावर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीत मामा म्हणून ओळखले जाते. तसेच अशोक सराफ हे चित्रपटात आपल्या शर्टाची दोन बटने कायम उघडे का ठेवतात, याचं कारणही तसेच आहे.

अशोक सराफ यांनी आपल्या टायमिंगसेन्सद्वारे रसिकांना मनमुराद हसवण्याचे काम केले आहे. आपल्या शर्टाची दोन बटने उघडी ठेवून त्यांनी नवीन फॅशनच रसिकांपर्यंत पोहचवली होती. धुमधडाका, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा अशा अनेक चित्रपटात त्यांची ही स्टाईल फेमस झाली होती. त्यांच्या या स्टाईलवर अशोक सराफ यांना विचारले असता त्यांनी गंमतीशीर उत्तर दिल.

अशोक सराफ यांनी, मी ज्यावेळी चित्रपट करायचो त्यावेळी बटनाच्या शर्टची फॅशन होती. शुटिंगच्या दरम्यान लाईटस् आणि तिथल्या वातावरणामुळे मला फार उकडायचे त्यामुळे मी शर्टची दोन बटने उघडी ठेवत होतो. पण लोकांना ती स्टाईल वाटत असल्याचे गंमतीशीर उत्तर दिलं.