मुंबई : टीम इंडियाने टी20 विश्वचषक जिंकला. आता टीम इंडिया दौऱ्यावरून परतली आहे. सकाळी दिल्लीमध्ये टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता ( सायंकाळी ) थोड्याच वेळात मुंबईमध्ये विश्वविजयी टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे. ओपन बसमधून ही विजयी मिरवणूक निघणार आहे. या मिरावणुकीसाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली. वानखेडे स्टेडियमही गर्दीने फूल्ल झालेय.

चाहत्यांची गर्दी वाढत असतानाच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. परंतु या धो धो पावसातही चाहत्यांचा उत्साह कायम आहे. रस्त्यावर दोन्ही बाजूला चाहते छत्र्या उघडून बसले आहेत. वानखेडेमध्येही छत्र्या उघडून चाहते बसले आहेत. मरीन ड्राईव्ह चाहत्यांच्या रंगात नाहून निघाले आहे . मुंबईकरांच्या स्पिरिटचे सोशल मीडियावर कौतुक होतेय. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या स्वागातासाठी उभे असणाऱ्या चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय.

ढोल तशाच्या गजरात लाडक्या टीमचे स्वागत –

टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळामध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झालय. टीम इंडियाचे खेळाडू जेव्हा विमानतळामधून बाहेर आले , तेव्हा ढोल ताशाच्या गजरात खेळाडूंच स्वागत करण्यात आलं. मरीन ड्राईव्ह ते वानखडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक निघणार आहे. रोहित आणि टीम इंडिया ओपन बसमधून चषकासोबत चाहत्याचे अभिवादन स्विकारणार आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. तरीही विजयी मिरवणूक होणार आहे. चाहत्यांचा जल्लोष याठिकाणी वाढतच चालला आहे.

चाहत्यांना आज प्रवेश मोफत –

बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीन आज वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. मात्र यासाठी वेळेवर पोहोचण्याची अट होती. त्यामुळे दुपारपासूनच चाहत्यांनी वानखेडेवर गर्दी केली होती. चार वाजताच वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी फुल्ल भरले आहे. आता स्टेडियम पूर्णपणे भरले असून दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

विजयी रॅली मोबाईलवर पाहता येणार –

टीम इंडियाची आज होणारी मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर सायंकाळी 4 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 1, हिंदी 1, 3 आणि त्यांच्या YouTube चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे जे चाहते मुंबईत पोहचू शकणार नाही, त्यांना आता टीव्ही आणि मोबाईलद्वारे या विजयी रॅलीचा आनंद घेता येईल.