कोल्हापूर (प्रतिनिधी) : टाकाळा येथील रुग्णालयाजवळ लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांने लंपास केली. याबाबतची फिर्याद अभिजित अरुण कांबळे (वय २८, रा.कसबा बावडा) याने राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पोलिसांनी समजलेली माहिती अशी, अभिजित कांबळे हे घरगुती कामानिमित्त टाकाळा येथे आले होते. यावेळी त्यानी रुग्णालयाजवळ आपली २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल पार्क केली. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. दुचाकी चोरीला गेल्याचे कांबळे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोटारसायकल शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकी मिळून न आल्याने त्यामुळे त्याने चोरट्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.