उत्तर प्रदेश ( वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेश, आग्रा जिल्ह्यातील एका गावात दोन भावांनी आत्महत्या केली. शनिवारी लहान भाऊ संजय याचा मृतदेह गावाबाहेरील शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सोमवारी (24 जून) दुपारी मोठा भाऊ प्रमोद यानेही आत्महत्या केली. प्रमोदचा मृतदेहही गावाबाहेरील मंदिराजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे सादाबाद पोलीस ठाणे पोलिसांनी या दोघांचा छळ केल्याने या दोघा भावांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार आग्रा जिल्ह्यातील रूपधनू हातरस पोलिसांच्या छळाला कंटाळून बर्हानच्या रुपधनू गावात तीन दिवसांत दोन भावांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी लहान भाऊ संजय याचा मृतदेह गावाबाहेरील शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतांच्या नातेवाईकांनी सादाबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हरिओम अग्निहोत्री यांच्यावर छळाचा आरोप करत आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. तसेच बऱ्हाण पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे.


सोमवारी 24 जून दुपारी मोठा भाऊ प्रमोद याने आत्महत्या केली. प्रमोदचा मृतदेह गावाबाहेरील मंदिराजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या मृत्यूंना पोलिस जबाबदार आहेत. त्यामुळे पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक गावकऱ्यांकडून केली आहे. त्यामुळे यावर उत्तर प्रदेश राज्य सरकार पोलिसांवर कारवाई करणार का ? असा सवाल आता विचारला जावू लागला आहे.