काही,महिन्यांपूर्वी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी सुद्धा मोरिंगा म्हणजेच शेवग्याचा पाला व शेंगा या आरोग्यदायी आहेत असे सांगितले होते. तेव्हापासूनच या पारंपरिक भाजी बरीच ट्रँडींगला आली आहे.

तुम्हाला माहीत आहे का? शेवग्यामध्ये सुमारे ६.७ ग्रॅम प्रोटीन असते जे स्नायूंच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते, इतकंच नाही तर शेवग्याच्या पाल्यामध्ये संत्र्यापेक्षा सातपट जास्त व्हिटॅमिन सी, पालकापेक्षा तिप्पट लोह आहे आणि दुधापेक्षा चारपट जास्त कॅल्शियम असते. उन्हाळ्यात तर शरीराचा नैसर्गिक कूलर म्हणून शेवग्याचा पाला किंवा शेंगा काम करू शकतात

शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याची पाने, साल, फुले, फळे आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात, जे 300 हून अधिक रोगांवर औषध आहे. चला, शेवग्याच्या भाजीचे फायदे जाणून घेऊया.

शेवग्याच्या पानांची भाजी

शेवग्याच्या शेंगाबरोबरच त्याच्या पानांचीही भाजी केली जाते. या पानांत अनेक गुणकारी घटक असतात. यात व्हिटॅमिन ए, बी 1, बी2,बी6, सी आणि फोलेटचा समृद्ध स्त्रोत असतो. त्याचबरोबर यात मॅग्नीशियम, कॅल्शियम, झिंक आयर्न आणि फॉस्फोरचा स्त्रोत असतो. काही ठिकाणी मेथीच्या भाजीप्रमाणे शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते. तर, काही ठिकाणी पाने मीठाच्या पाण्यातून उकडवून घेतात. नंतर त्यांची भाजी बनवून चपाती किंवा भातासोबत खाल्ली जाते.

शेवग्याच्या शेंगा व पानांच्या भाजीचे फायदे

थकवा दूर होतो
तुम्हा मानसिक समस्येने ग्रस्त आहात तर शेवग्याच्या पानांचे सेवन कराच. यामुळं मानसिक समस्येबरोबरच स्मरणशक्तीदेखील सुधारते. तुम्ही शेवग्याच्या पानांचे सुपदेखील बनवू शकता. त्यामुळं थकवा कमी होतो आणि व्हायरल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.

स्मरणशक्ती तल्लख होते
शेवग्या शेंगा व त्याच्या पानाची भाजी लिव्हर आणि किडनी डिटॉक्सीफाइ करण्यात मदत करते. त्यामुळं पोटदुखी, अल्सरसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तणाव, चिंता दूर करण्यासाठी तसंच, थॉयराइड, ब्रेस्ट मिल्कच्या उत्पादनात वाढ होते. ज्या महिला पहिल्यांदा आई झाल्या आहेत त्यांनी ही भाजी खाल्लीच पाहिजे.

शेवग्याच्या फुलांची भाजी
शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधीवातासाठी चांगली आहे. शेंगाची भाजीसुद्धा स्नायूगत संधीवातासाठी तसेच कृमीनाशक आहे.