मुंबई – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि भाजप नेते नितेश राणे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ते दोघे एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौतवर केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरु आहे. कंगना रनौत इतक्या मोठ्या आहेत त्यांना राष्ट्रपती भवानातच ठेवयाला हवं. असा टोला त्यांनी कंगना रनौतवर लगावला होता यावर आता भाजप नेते नितेश राणे यांनी कंगणा रनौतची बाजू घेत संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
काय म्हणाले नितेश राणे..?
नितेश राणे म्हणाले, कंगना रनौत या बॅकडोअर एन्ट्री घेतलेल्या खासदार नाहीत, तर कंगना रनौत यांनी महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं. त्या निघून गेल्या. यावर संजय राऊत यांना मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत, असं नितेश राणे म्हणाले.
या दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना नितेश राणे असेही म्हणाले की, “उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा बंगल्यावर सचिन वाझे हा किती दिवस राहायचा? त्याच उत्तर कधी देणार?” तर संजय राऊत हे महाशय ज्या दिल्लीच्या निवासस्थानी राहतात, तिथे बॉलीवूडची कोणती नटी येऊन राहायची याची पण माहिती द्यायची का?, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे. आता यावर संजय राऊत हे नितेश राणे यांना काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे