कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून, महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापुरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत. त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल, असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी ट्विटद्वारे दिला आहे.

आज कर्नाटकातील बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांना कन्नड वेदिकांनी लक्ष्य केले. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद पेटला असून, या घटनेचा निषेध संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे आणि ट्विट करून इशारा दिला आहे.