कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील आर. के. नगर- मोरेवाडी येथील एका घराच्या दारातून अडीच ते तीन फूट लांबीचे व ९ इंच गोलाकार खोड असलेले २० हजार रुपये किमतीच्या चंदनाचे झाड जमिनीपासून तोडून चोरुन नेण्यात आले आहे. या चोरी प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विवेक विजय कोप (वय ४६, आर. के. नगर मोरेवाडी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.ही घटना गेल्या दोन दिवसांंत घडली आहे.