नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारताचे मोदी सरकार डीपफेक व्हिडिओंबाबत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. याबाबत लवकरच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बैठका घेण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
व्हिडिओमध्ये एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा शरीर डिजिटल पद्धतीने बदलणे याला डीपफेक म्हणतात. मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सह बनवलेले हे व्हिडिओ कोणालाही सहज फसवू शकतात. वैष्णव यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारने अलीकडेच डीपफेक प्रकरणावर कंपन्यांना नोटीस बजावली होती आणि प्लॅटफॉर्मने देखील प्रतिसाद दिला. मात्र अशा मजकुरावर कारवाई करण्यासाठी कंपन्यांना अधिक आक्रमक व्हावे लागेल, असे ते म्हणाले.
वैष्णव यांनी पत्रकारांना सांगितले. ..आणि आम्ही लवकरच सर्व मंचांची बैठक घेणार आहोत…कदाचित येत्या ३-४ दिवसांत. आम्ही त्यांना यावर विचारमंथन करण्यासाठी बोलावू आणि प्लॅटफॉर्मने ते (डीपफेक) थांबवण्यासाठी आणि त्यांच्या सिस्टम साफ करण्यासाठी पुरेसे काम केले आहे.
याची खात्री करू.” मेटा आणि गुगलसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मला बैठकीसाठी बोलावले जाईल का, असे विचारले असता मंत्र्यांनी होकारार्थी उत्तर दिले. वैष्णव यांनी असेही स्पष्ट केले की प्लॅटफॉर्मना सध्या आयटी कायद्यांतर्गत मिळणारी ‘सेफ हार्बर इम्युनिटी’ पुरेशी कारवाई केल्याशिवाय लागू होणार नाही.