आजरा (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षीक निवडणूक चुरशीने होत आहे. प्रचारामध्ये दोन्ही पॅनेलचे नेते एकमेकावर आरोपांच्या फैरी झाडत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. कारखाना बंद असताना ही निवडणूक होत आहे. कारखाना बंद पडल्याचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. एक-एक मत मिळवण्यासाठी दोन्ही आघाडींकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आजरा तालुक्यात १००० हून अधिक मते निर्णायक आहेत.

आजरा तालुक्यातून ज्येष्ठ नेते जयंवतराव शिंपी आणि आण्णा भाऊ समूहाचे नेते अशोक चराटी यांनी आज आजरा तालुक्यातील पूर्व भागातील साखर कारखाना कार्यक्षेत्रात सभासद आसणाऱ्या भादवणवाडी, पेद्रेवाडी, कोवाडे, निगुडगे, सरोळी, कानोली, गजरगाव, हारूर, कानोली, सुळे, लाकूडवाडी, सरंबळवाडी या गावांतील प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत काळभैरी शेतकरी कामगार विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आजऱ्यातून मताधिक्य मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आजरा कारखाना उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, विलास नाईक, रमेशराव रेडकर अभिषेक शिंपी, दशरथ अमृते, संजय पाटील, संभाजी सरदेसाई, अजितसिंह देसाई, भूषण देसाई, विलास पाटील, आकाराम देसाई यांच्यासह तालुक्यातील पूर्व भागातील गावचे सभासद उपस्थित होते.