कळे ( प्रतिनिधी ) : सावर्जनिक ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहांचा महिलांनी लाभ घ्यावा, पन्हाळा तालुक्यातील ५६ ग्राम पंचायतीवरती महिलाराज असून सरपंच महिलांनी स्वच्छतागृहांसाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी केले. सावर्डे तर्फे असंडोली (ता.पन्हाळा) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानावेळी बोलत होत्या.
ग्रामपंचायतीतील स्वच्छतागृह सुस्थितीत असावीत, ग्रा.पं.अधिकाऱ्यांनी देखरेख करावी, महिलांनी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करून स्वच्छतेची सवय अंगीकारावी, तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियनाचा लाभ घेऊन अधिकाधिक गावे बक्षीसपात्र ठरावीत, असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच संभाजी कापडे, प्रतापसिंह काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ग्रा.पं.अधिकारी तानाजी पाटील यांनी केले. तर आभार समीर पाटील यांनी मानले. दरम्यान ग्रामपंचायतीच्या प्रांगणात स्वच्छता अभियनाची शपथ घेण्यात आली. तसेच आरोग्य उपकेद्रांत आरोग्य शिबीरला भेट दिली.
कार्यक्रमास गटविकास अधिकारी पंचायत समिती पन्हाळा सोनाली माडकर, विस्तार अधिकारी पी. डी. भोसले, राजेंद्र तळपे, कुबेर उपाध्ये, ग्रा.पं.अधिकारी तानाजी पाटील, उपसरपंच नंदाताई पाटील, सदस्या सारिका सातपुते, ज्योती गुरव, शिल्पा बच्चे, गणेश भोसले, संदीप सुतार, सरदार पाटील, बळवंत मोरे, संजय मोरे, गोविंद पाटील, आदी मान्यवर, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.