टोकियो (वृत्तसंस्था) : जपानमध्ये एका विचित्र आजाराने थैमान घातलं आहे. मांस खाणाऱ्या या बॅक्टेरियामुळं अनेक संक्रमीत झाले आहेत. एकदा का व्यक्तीला रोगाचा संसर्ग झाला की तो 48 तासांतच त्याचा जीव जावू शकतो. कोरोना संक्रमणानंतर हा आजार फैलावत असल्याचे समोर आलं आहे. नॅशनल इन्स्टिट्युड ऑफ इन्फेक्शियस डिसीजनुसार स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (एसटीएसएस) असं या आजाराचे नाव आहे. या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर 48 तासांतच आक्रमक रुप धारण करतो.

नॅशनल इन्स्टिट्युड ऑफ इन्फेक्शियस डिसीजनुसार, या वर्षी 2 जूनपर्यंत जपानमध्ये एसटीएसएसचे 977 प्रकरणे समोर आली आहेत. जे मागील वर्षाच्या तुलनेत जास्त आहेत. ही संस्था 1999 पासून या आजाराच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे.ग्रुप ए स्ट्रेप्टोकोकस (जीएएस)नुसार, लहान मुलांच्या घशाला सूज आणि घशात खवखव निर्माण करते. ज्याला स्ट्रेप थ्रोटम्हणून ओळखले जाते.

ब्लूमर्गनुसार, काही प्रकारचे बॅक्टेरियामुळं वेगाने लक्षणे दिसू लागतात. ज्यामुळं अंगदुखी, सूज, ताप, लो ब्लड प्रेशर त्यानंतर नेक्रोसिस, श्वास घेण्यास त्रास, ऑर्गन फेल्युअरमुळं माणसाचा मृत्यू होऊ शकतो.